Press "Enter" to skip to content

विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेची अभिनव संकल्पना.


रविवार दिनांक १६ जून रोजी “विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे” पहिले शिबिर ७०० पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेल मधील व्ही के हायस्कूल येथे पार पडले. यावेळी उपस्थित तरुणांना श्री सुनील गायकवाड ,(एक्स. सीनियर मॅनेजर,एअर इंडिया कमर्शियल डिपार्टमेंट), श्री.भूषण खैरे (एअरपोर्ट ऑपरेशन्स इन,कॉन्टस ऑस्ट्रेलियन एअरलाइन्स), श्री.सर्वेश पाटील (कस्टमर एक्झिक्युटिव्ह, एअर इंडिया मुंबई एअरपोर्ट), श्री.रुद्राश गोवारी(एअर इंडिया, गोवा एअरपोर्ट) श्री वसीम सर (फिनिक्स एअरपोर्ट ट्रेनिंग अकॅडमी) यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने जॉब कोणत्या एअरलाइन्स मध्ये आहेत, इंटरव्यू साठी जाताना कसा ड्रेस कोड पहिजे, आपले डॉक्युमेंट कशाप्रकारे असावेत, नक्की कामाचं स्वरूप काय आहे, ड्युटीची वेळ किती तास आणि कुठल्या शिफ्ट असतात, तुमच्या आत्मविश्वासावर,बोलण्याच्या कलेवरती आणि शिक्षणावर तुमचं सिलेक्शन होतं अशाप्रकारे मार्गदर्शन उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे यासाठी त्यांनी विविध ऑनलाईन किंवा ऑफलाईन इंग्रजीचे कोर्सेस केलात तरी सुद्धा पंधरा दिवसात बोलण्या आणि समजण्या इतपत इंग्रजी शिकू शकता असे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार श्री बाळाराम पाटील, श्री काशिनाथ पाटील(मा.प..पं.स. सभापती), मा.श्री गोपाळ भगत,मा.नगरसेविका सौ प्रीती जॉर्ज आणि सौ.सारिका भगत, श्री.देवा पाटील (जिल्हाध्यक्ष पु.यु.सं.रायगड), श्री बबन विश्वकर्मा हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.