Press "Enter" to skip to content

परेश ठाकूर यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने रंगले कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन 

पनवेल(प्रतिनिधी)

भव्य मैदान आणि त्यात आकर्षक रोषणाईसह लाल मातीचा दर्जेदार आखाडा, भव्य व्यासपीठ, शेकडो मान्यवरांची उपस्थिती, तिन्ही दिशेला हजारोंच्या संख्येने भरलेली भरगच्च प्रेक्षक गॅलरी, हलगीचा ठेका, दणदणीत सूत्रसंचालन, दक्ष पंच, कुस्तीचा जादूगार पैलवान देवा थापाची चपळाई अशा सर्व सूत्रांचे एकीकरण करत कामोठेत कुस्तींच्या दंगलीचे अधिवेशन रंगले! निमित्त होते ते पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे. 

महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठ्यात ‘मा.श्री. परेश ठाकूर केसरी २०२४’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने रंगले. या आखाड्यात नेपाळमधील पैलवान देवा थापा आणि हिमाचल प्रदेशमधील पैलवान नवीन चौहान यांची बिग शो मॅच आकर्षण ठरली. यामध्ये देवा थापा याने नवीन चौहानला चीतपट करून बाजी मारली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कुस्तीपटू या कुस्तीच्या दंगलीत सहभागी झाले होते. एकास एक सरस अशा कुस्त्यांनी वातावरणात जल्लोष पहायला मिळत होता.   

या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव हिंदकेसरी पैलवान योगेश दोडके यांच्या हस्ते झाले. या वेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे तसेच भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रविण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम पाटील, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, दिलीप पाटील, डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, एकनाथ गायकवाड, बबन मुकादम, तेजस कांडपिळे, अमर पाटील, गोपीनाथ भगत, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, शिला भगत, कुसूम म्हात्रे, अरुणा भगत, पुष्पा कुत्तरवडे, भाऊ भगत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते हॅप्पी सिंग, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विद्या तामखेडे, रुपेश पावशे, विनोद नाईक, हर्षवर्धन पाटील, तेजस जाधव, यांच्यासह इतर पदाधिकारी, तालुका कुस्तीगीर असोसिएशनचे सदस्य आणि मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कुस्तीगीर पैलवान नुसता ताकदवान असून चालत नाही, तर त्याच्याबरोबर अंगात चपळता असली पाहिजे. डावपेच टाकण्याची पद्धतही महत्त्वाची असते. यातून खर्‍या अर्थाने आपले जीवन घडवण्याचे काम कुस्तीगीरांमधून होत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, काही वर्षांपूर्वी येथे मोठ मोठ्या कुस्त्यांचे सामने भरवले जात होते. कोरोनानंतर ते बंद झाले. परेश ठाकूर हे खेळामध्ये नेहमीच रस घेत असतात. त्यामुळे त्यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कुस्तीचे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यातून कुस्तीपटूंना अपेक्षेपेक्षा जास्त प्रोत्साहन मिळालेले दिसत आहे. हिंदकेसरी योगेश दोडके हे राज्य कुस्ती असोसिएशनचे सचिव आहेत. त्यांनी परेश ठाकूर यांची आज रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली परेश ठाकूर आपल्या जिल्ह्यात कुस्तीला चालना देतील. पनवेल तालुक्यात कुस्तीचा आखाडा होणे गरजेचे आहे. गव्हाण ग्रामपंचायतीत आम्ही सिडकोकडे २० हजार मीटरचा प्लॉट मागितला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येणार आहे, त्याच्या बाजूला एक एकर जागा कुस्तीचा आखाडा बनवण्यासाठी घेण्याचा आमचा मानस आहे. सिडकोच्या परवानगीसाठी वेळ लागेल, पण मनामध्ये आलंय त्यामुळे ते पूर्ण केले जाईल, असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परेश ठाकूर यांच्यावरील प्रेमामुळे उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचे आभार मानून भावी काळात कुस्तीगीरांनी स्पर्धेत अधिक जोमाने भाग घ्यावा, असे आवाहन केले व परेश ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
        आमदार निरंजन डावखरे यांनी परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त मातीतील कुस्ती आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ते म्हणाले, आपल्या मातीबरोबर जोडून ठेवण्यासाठी या पद्धतीचे खेळ आवश्यक आहेत. हल्ली आपण पाहतो की कबड्डी, कुस्ती मॅटवरच खेळ जास्त होतात. अशा वेळी मातीतील कुस्तीचा खर्‍या अर्थाने आनंद आपल्या इथे पहायला मिळत आहे. यातूनच परेशशेठ यांची नाळ येथील मातीशी जुळल्याचे दिसून येते

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.