आनंद मेळाव्यात समाजाच्या ऍपचे उदघाटण संपन्न
पनवेल / प्रतिनिधी वैश्य वाणी समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागत व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संपादक महेश म्हात्रे यांनी पनवेल येथे काढले. ते वैश्य वाणी समाजाच्या आनंद मेळावा आणि अँप्लिकेशन लाँच कार्यक्राचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. रविवार दिनांक ३१ मार्च रोजी पनवेलच्या मिरची गल्ली येथील वैश्य समाजाच्या हॉल मध्ये ठाणे रायगड जिल्हा वैश्य वाणी समाज आणि वैश्य वाणी एक हात मदतीचा या संस्थांच्या संयुक्तिक विद्यमाने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. महेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते यावेळी वैश्य वाणी समाजाच्या अँप्लिकेशनचे उदघाटण संपन्न झाले. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वैश्य वाणी समाजाच्या बांधवांना एकत्र आणून त्याच्यात समन्वय साधने सुलभ जावे या हेतूने समाजाच्या वतीने पनवेलचे वैभव अनिता बळीराम आंग्रे आणि बेलापूरचे वैभव सुगंधा बळीराम सोनटक्के यांच्या संकल्पनेतून स्मार्ट फोन साठी एप्लिकेशन निर्माण करण्यात आले आहे. रविवारी प्रमुख पाहुणे महेश म्हात्रे यांच्या शुभहस्ते या एप्लिकेशन चे उदघाटन संपन्न झाले. समाजातील लघुउद्योजक,होतकरू उद्योजक यांना प्रोत्साहन मिळावे तसेच यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी हातभार लागावा या उदात्त हेतूने सदरच्या मेळाव्यात स्टॉल्स उभारण्यात आले होते. तसेच विविध गुणदर्शन करण्यासाठी नृत्य,गायन,वादन असे मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.वैश्य वाणी समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत मेळाव्याला उदंड प्रतिसाद दिला. मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. वेबप्रिन्ट सोल्युशन्स कंपनी ने समाजाचे एप्लिकेशन बनवून दिल्याबद्दल कंपनीचे आभार व्यक्त करण्यात आले.
या मेळाव्याला
महेश म्हात्रे,डॉ विशाल माने ( पोलीस अधिकारी ) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर वैश्य वाणी समाजाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अशोक भोपतराव,ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश कोंडिलकर,पनवेल तालुका अध्यकध सुनील शेटे,वैश्य वाणी एक हात मदतीचा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दलाल,आय व्ही एफ च्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा हर्षला तांबोळी, पनवेल तालुका वैश्य वाणी महिला समाजाच्या रसिका महाजन,योगेश महाजन,संतोष दलाल,महेश आंग्रे,सतीश पातकर,वैभव आंग्रे,वैभव सोनटक्केआदी मान्यवरांच्यासह शोकडो समाजबांधव सहभागी झाले होते.
Be First to Comment