कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मागणी!
प्रतिनिधी/ उलवे.
मोरावे,उलवे नोड- सेक्टर -3 येथे लांगेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे या शिवमंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.आत्ताच सुरु झालेल्या अटल सेतूला जोडण्यासाठी या मंदिराला लागूनच कोस्टल रोड होऊ घातला आहे. या रोडमुळे येणाऱ्या भाविकांची अडचण होणार आहे. या मंदिरात भाविक पूजाअर्चा व ध्यानधारणा करत असतात तसेच अबाल वृद्धांसाठी हे विरंगुळा केंद्र देखील आहे. सिडकोने या विभागात नागरिकांसाठी उद्यान किंवा विरंगुळा केंद्र उभारलेलं नाही.लोकभावना लक्षात घेऊन लांगेश्वर मंदिराच्या बाजूला जागा सोडून लांबून कोस्टल रोड करण्यात यावा अशी मागणी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी सिडको कडे केली. यावेळी सिडकोचे अधीक्षक अभियंता श्री. गोसावी, जयकुमार कंपनीचे अधिकारी तसेच श्री. अरुण नाईक, श्री. उत्तम कोळी व शेकडो भाविक उपस्थित होते.
Be First to Comment