मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत फलकाचे अनावरण संपन्न
मराठी हृदसम्राट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मा.राज ठाकरे यांचा झंझावात आश्वासक प्रगती करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.त्यांच्या धेय्य धोरणांना शाश्वत स्वरूप देण्यासाठी अनेक हात पुढे सरसावत आहेत.शहरी भागात विशेष करून तरुण वर्गाला आपलीशी वाटणाऱ्या या संघटनेची पाळेमुळे आता ग्रामीण विभागात देखील तितक्याच जोमाने रुजू लागले आहेत. याचाच प्रत्यय रविवारी गव्हाण विभागातील बेलपाडा या गावी आला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुक्याचे वतीने आज गव्हाण विभागातील बेलपाडा गाव येथे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम मोठया दिमाखात पार पडला. सदर कार्यक्रमाचे वेळी स्वागत फलकाचे अनावरण करण्यात आले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी सेना उपाध्यक्ष राजेश कोळी,पनवेल तालुका सचिव अमोल पाटील, उरण तालुका सचिव अल्पेश कडू,पनवेल उप तालुका अध्यक्ष चिंतामणी मुंगाजी , उप तालुका अध्यक्ष निर्दोष गोंधळी,उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील, गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश देशमुख, बाळकृष्ण घरत , अरुण म्हात्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी नियुक्त करण्यात आले असून यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली तसेच आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
Be First to Comment