Press "Enter" to skip to content

प्रभुदास  भोईर यांच्या नेतृत्वाखाली एम एच ४६..आम्ही एकत्र! या संघटनेची स्थापना

अद्ययावत आर टी ओ कार्यालय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
– माजी आमदार बाळाराम पाटील

       कळंबोली / प्रतिनिधी.

शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली आरटीओ कार्यालयाशी संबंधित ड्रायव्हिंग स्कूल आणि वाहन प्रतिनिधी यांनी एकत्र येत एकोप्याने कार्यरत राहण्याच्या दृष्टिकोनातून MH ४६..आम्ही एकत्र! या संघटनेची स्थापना केली आहे.माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण गुरुवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले.
           संघटनेच्या नामफलक अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने कळंबोली आर.टी.ओ कार्यालय येथे श्री सत्यनारायण महापूजेचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ड्रायव्हिंग स्कूल चे चालक व संबंधित कर्मचारी तसेच तमाम वाहन प्रतिनिधी, कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी आदींनी श्री सत्यनारायणा पूजेच्या तीर्थ प्रसादचा लाभ घेतला.MH 46..आम्ही एकत्र! ही संघटना प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून या संघटनेचे समन्वयक म्हणून विवेक खाडे आणि सुजित भगत काम पाहणार आहेत. मान्यवरांच्या स्वागतासमारंभाच्या सोहळ्यामध्ये विवेक खाड्ये यांनी प्रास्ताविक सादर केले.यावेळी त्यांनी एकत्र येण्यामागची भूमिका विषद केली तसेच प्रभुदास भोईर यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केले.सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की २०१० सालापासून आपण येथे कार्यरत आहोत. कार्यालयाची जागा मिळवण्यासाठी आपण खूप संघर्ष केला आहे. यापूर्वी देखील आपण एकोप्याने काम केले आहे असेच एकोप्याने काम यापुढे करत राहू. माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांचे नेहमीच सहकार्य आपल्याला लाभत असते असे देखील निलेश धोटे आपल्या मनोगतात म्हणाले.
           विविध संघटनांनी प्रभुदास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येण्याच्या निर्णयाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सर्वप्रथम स्वागत केले. तसेच संघटनेचा आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तसेच अद्ययावत आर टी ओ कार्यालय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिले. प्रभुरास भोईर यांची प्रशंसा करताना माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले की एखाद्याची इच्छाशक्ती प्रबळ असली तर तो कशावरही मात करून समाजात आपले स्थान निर्माण करू शकतो याचे जिथे जागते उदाहरण म्हणजे प्रभुदास भोईर !
         या सोहळ्याला माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या समवेत सचिन विधाते,प्रादेशिक परिवहन अधिकारी,प्रभुरास भोईर,शेकाप चे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश कडू, ट्रॅफिक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर,माजी नगरसेवक रवींद्र भगत,पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, आनंद धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.तत्पूर्वी माथाडी कामगारांचे खंबीर नेतृत्व म्हणून समजले जाणारे गुलाबराव जगताप यांनी संघटनेला शुभेच्छा दिल्या तसेच श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.