वृद्ध,आजारी,लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा.
पनवेल / प्रतिनिधी.
नुकतीच पनवेल रेल्वे स्थानकात बॅटरी ऑपरेटेड कार्ट ची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली.यापूर्वी बॅटरी वर चालणाऱ्या प्रवासी वाहक गाड्यांची अशी सुविधा फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपलब्ध होती. परंतु आता ही सुविधा लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पनवेल रेल्वे स्थानकात देखील उपलब्ध असेल.
सेंट्रल रेल्वे ने वृद्ध तथा ज्येष्ठ नागरिक, तान्ह्या मुलांसह प्रवास करणाऱ्या महिला,लहान मुले अथवा अवजड सामान घेऊन प्रवास करणाऱ्यांच्या साठी ही सुविधा कार्यान्वित केली आहे. ही सुविधा सशुल्क असणार आहे.सेंट्रल रेल्वे चे पनवेल स्थानक “अ” वर्ग श्रेणीमध्ये येथे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या या स्थानकात प्रचंड असते. प्रवाशांच्या तुलनेत हमालांची संख्या मर्यादित असल्यामुळे बऱ्याच वेळेस आपले सामान घेऊन प्रवास करावा लागतो. अशा वेळेस वृद्ध, महिला,लहान मुले यांची ससेहोलपट होते. परंतु आता मात्र बॅटरी ऑपरेटेड कार्ट उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.
एका फेरी साठी २० रुपये शुल्क आकारले जाईल असे रेल्वेच्या सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.एका वेळेस सात प्रवासी वाहून नेण्याची क्षमता या वाहनामध्ये आहे.
Be First to Comment