Press "Enter" to skip to content

राज ग्रुपच्या तुलसी होममेकरचे जल्लोषात भूमिपुजन

सिडकोने बांधलेल्या घरांचा पुर्नविकास प्रारंभ

खांदा कॉलनीत तीन मजली इमारतीच्या जागेवर १४ मजली ५ टॉवर

पनवेल/ वार्ताहर. 

नाईलाजास्तव मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या सिडको वसाहतींमधील रहिवाशांचा बुधवारचा दिवस आनंदाचा ठरला. खांदा कॉलनीतील सिडकोच्या पीएल ६ प्रकारच्या सह्याद्री सोसायटीच्या पुर्नविकासाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात बुधवारी पार पडला. तीन मजली इमारतींच्या  जागेवर अवघ्या ३ वर्षांत १४ मजली ५ टॉवर उभे राहतील आणि सर्वसामान्यांचे स्वप्न पुर्ण होणार आहे. 

३० वर्षांपुर्वी बांधलेल्या इमारतींची पडझड झाली तरी पुर्नविकासाचा कठीण प्रश्न सुटू शकला नव्हता. अनेक सोसायट्या १५ वर्षांपासून सिडकोकडे पुर्नविकासासाठी पाठपुरावा करीत होत्या. सिडकोच्या महामंडळाच्या अटी पार करून कोणताच प्रकल्प पुढे जात नव्हता.  सिडकोसह विविध विभागांच्या एनओसी मिळवून पनवेल महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविणे म्हणजे एक दिव्य होते.या सर्व  अटी शर्ती व विविध विभागांच्या परवानग्यांची शर्यत पार करून खांदा कॉलनीतील सह्याद्री सोसायटी पुर्नविकासासाठी नियुक्त केलेल्या राज ग्रुपच्या तुलसी होममेकरने बाजी मारली आहे. पुर्नविकासाची पहिली बांधकाम परवानगी मिळणे बाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यांना यश प्राप्त झाले आहे. खांदा कॉलनीतील मुंबई पुणे महामार्गांला लागून असलेल्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी असून पुढील काही वर्षांत १४ मजली टॉवर उभे राहणार आहे. सह्याद्री सोसायटीने पनवेल महापालिका क्षेत्रात पुर्नविकासाची बाजी मारली आहे. बुधवारी मोठ्या धुमधडाक्यात भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला. खांदा कॉलनी सेक्टर १४ येथे विकसित करण्यात येणाऱ्या सह्याद्री सोसायटी जमिनदोस्त करण्यात आली असून पुर्वीच्या तीन मजली

इमारतीच्या जागेवर तब्बल १४ मजली प्रशस्त ५ टॉवर उभारले जाणार आहेत. राज ग्रुपच्या तुलसी होममेकर या कंपनीकडून हा गृहप्रकल्प विकसित केला जाणार आहे. जुन्या १९२ सदनिकाधारकांना वाढीव एरीयासह प्रशस्त नव्या घरांसह एकून ४६० नवीन घरे बांधली जाणार आहेत. शिवाय ४९ व्यवसायिक गाळे या नव्या तुलसी सह्याद्री सोसायटीत असतील अशी माहिती राज ग्रुप तुलसी होममेकर कंपनीचे प्रविणभाई पटेल आणि अभिजित पाटील यांनी सांगितले. तुलसी होममेकर कंपनीचे नवी मुंबईतील जवळपास जुन्या इमारतींच्या २२ सोसायट्यांच्या पुर्नविकासाठी प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, एरोली, वाशी येथे सदनिकाधारकांसोबत तांत्रिक मुद्द्यांवर चर्चां सुरू आहे. तसेच काही सोसायट्या पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली या भागातील आहेत. 

 

 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.