पनवेल / प्रतिनिधी.
हल्ली कार्यकर्त्यांना सक्षम व्हा! नेत्यांच्या मागे उगाच फिरू नका!अशा आशयाचे उपदेशाचे डोस पाजणारे अनेक स्टोरिज, मिम्ज,रिल्स आणि पोस्ट फिरत असतात.नेते मंडळी तुम्हाला वाऱ्यावर सोडतील असा संदेश या कंटेंट मधून फिरत असतो.परंतु कार्यकर्त्यांना चारचाकी भेट देणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्यासारखे नेते पाहिले की हे सारे कंटेंट पोकळ वाटायला लागते.
शैक्षणिक, क्रीडा,धार्मिक क्षेत्रांमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून तन मन धनाने सर्वतोपरी सहकार्य करणारे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे राजकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम सातत्याने करत असतात. क्रिकेटसामने , कबड्डी स्पर्धा, मंदिरे उभारणी अथवा जिर्णोद्धार, सामाजिक संस्था अशांना ते नेहमीच यथाशक्ती मदत करत असतात.
रायगड जिल्हा पर्यावरण सेलचे अध्यक्ष राजीव पाटील हे पेण तालुक्यातील रावे गावचे रहिवाशी त्यांना पर्यावरण सेलचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी या पदाला न्याय देत मोटार सायकल वरून खालापूर, महाड, अलिबाग, उरण फिरत काँग्रेस पक्षासाठी ते काम करत आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी या कार्यकर्त्यांची जाण ठेवत रायगड जिल्ह्यात फिरता यावे यासाठी त्याला दिनांक १३ फेब्रुवारी २०२४ रोजी चारचाकी भेट दिली. आपल्या कार्यकर्त्यांना,सहकार्यांना, मित्रांना यथाशक्ती ते पाठबळ देत असतात. म्हणून रायगड जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमधे महेंद्रशेठ घरत यांच्याबद्दल प्रेम व आदर आहे. राजीव पाटील यांना केलेल्या कामाची पावती त्यांना कार च्यास्वरूपात मिळाल्यामुळे त्यांनी जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे जाहीर आभार मानले आहेत.
Be First to Comment