जाई फाउंडेशन संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई द्वारा आयोजित एक दिवस कवितेसाठी हे कविसंमेलन के. गो. लिमये वाचनालय पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन शब्दवेलच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षा कवयित्री योगिनी वैदू, प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.प्रतिभा सराफ(ज्येष्ठ साहित्यिका),शिवाजी गावडे (ज्येष्ठ साहित्यिक) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दवेलचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी केले. काव्यसंमेलनास परीक्षक म्हणुन गझलकार कमलाकर राऊत,स्वाती गावडे व कविता राऊत यांनी काम पाहिले. एकुण ३५ कवीमधून कवी रामबंधु खंडू अंढागळे,चेंबुर यांना प्रथम, कवयित्री अक्षदा गोसावी,नेरूळ यांना द्वितीय तर कवी विलास पवार पनवेल हे तृतीय तर बालकवी समर नितीन मोतलिंग यांस उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी प्रतिभा सराफ यांनी आपला काव्यप्रवास रसिकांसमोर उलगडला व नवकवींना काव्यसादरीकरणाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात कवयित्री योगिनी वैदू यांनी कवितेच्या निर्मिती प्रक्रियेवर सुंदर भाष्यकेले . याप्रसंगी विविध सामाजिक विषयांवर उपस्थित कवींनी सादर करून रसिकांची दाद मिळवली. याप्रसंगी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शब्दवेलचे केंद्रिय संघटन प्रमुख देवेंद्र इंगळकर व आभार शब्दवेलचे रायगड जिल्हाध्यक्ष विलास पुंडले यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला प्रत्येक महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या कार्यक्रमात जास्तीतजास्त साहित्यिकांनी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी 7720945002(प्रविण बोपूलकर) या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
एक दिवस कवितेसाठी कविसंमेलन उत्साहात संपन्न
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment