Press "Enter" to skip to content

सांगवी येथे सोमजाई माता उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

सालाबादप्रमाणे हळदीकुंकू समारंभाला महिलांची अलोट गर्दी.

घारे कुटुंबीयांकडून सांगवी गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत / वार्ताहर

दरवर्षीप्रमाने सोमजाई माता उत्सहातील हळदी कुंकू समारंभाला यंदाचेही वर्षी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाची उपस्थिती राहिली. घारे कुटुंबीयांकडून सांगवी गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारती सुधाकर घारे आणि खांडपे ग्रुप ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच नमिता सुधाकर घारे या हळदीकुंकू समारंभाचे आयोजक होत्या.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कोकण विभाग विधानपरिषदेचे आमदार माननीय अनिकेत भाई तटकरे. यावेळी बोलताना ते म्हणाले की माननीय सुधाकरभाऊ घारे यांच्या माध्यमातून नेहमीच असे कार्यक्रम आयोजीत केले जातात. येणाऱ्या काळात तटकरे कुटुंबीय आणि राज्याचे कर्तुत्ववान उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार या भागास भरगोस निधीच्या माध्यमातून सुधाकर भाऊ घारेंच्या पाठीशी ठामपणे उभे असतील.”

रायगड जिल्ह्याचे माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष, कर्जत-खालापूर तालुक्याचे लोकप्रिय नेते, माननीय सुधाकर भाऊ घारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की हा कार्यक्रम गेले अनेक वर्षे घारे कुटुंबाकडून होत असला तरी आता तो फक्त घारे कुटुंबाचा राहिला नसून तुम्ही सर्व माता-बघीनींनी तो सर्वांचा कार्यक्रम बनवला आहे. आज याठिकाणी हा कार्यक्रम फक्त मनोरंजनाचा वाटत असला तरीसुद्धा त्याचं महत्त्व माझ्या दृष्टीने खूप जास्त आहे. एका स्रीचं काम फक्त संसार हाकायचा एवढंच नसून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ती असायला हवी. आमच्या सौभाग्यवती ज्यावेळी गावचा कारभार सांभाळतात तेव्हा कुठे जाऊन आम्हाला मतदारसंघाला वेळ देता येत आहे.

आज केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाची कामे करत आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे यांच्या मार्गदर्शनात महिला व बाल विकास विभाग लेक लाडकी योजना राबवत आहे. येत्या काळात या योजनांची अंमलबजावणी करण्याचा माझा प्रयत्न असेल.

ते पुढे म्हणाले की आजच्या दिवसाचं महत्त्व आध्यात्मिक आहे. पण यासोबतच मला सांगायचं आहे की, जेव्हा कधी विकासाचा विचार केला जातो. तेव्हा सर्वांना फक्त भौतिक विकास दिसतो. परंतु एखाद्या भागातील लोकांना भौतिक सुविधा मिळाल्या आणि ते समाधानी, आनंदी नसतील तर त्या विकासाला काही अर्थ नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भागातील जनतेचा हॅपिनेस इंडेक्स(Happiness Index) वाढावा. हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. यासोबतच आपल्या कार्यक्रमांना नेहमीच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमात आकर्षणाचे केंद्र ठरल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सेलेब्रिटी. यामध्ये सिेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, लग्नाची बेडी मालिकेतील सिंधू अर्थात सायली देवधर आणि टिपक्यांची रांगोळी मालिकेतील अप्पू अर्थात ज्ञानदा रामतीर्थकर. आपल्या आवड्त्या सिनेतारकांना पाहुन उपस्थित महिला वर्गाचा आनंद गगनाला भिडला.

यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने लावणी आणि गाण्यांवर नृत्य सादर करत सर्वांचे मनोरंजन केले. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना ती म्हणाली, “मुंबई-पुण्यापेक्षा इथला कार्यक्रम मला जास्त भावला. महिलांची एवढी गर्दी पाहून मी थकित झाले.”

महाराष्ट्राची हास्यजत्रा ची स्टार ॲंकर ही सध्या कर्जतमध्येच स्थायिक झाली असुन याहिवर्षी तिने कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. यावेळी बोलताना ती म्हणाली, “मी तुमची शेजारी आहे. माननीय सुधाकर घारेंची मला कर्जतमध्ये स्थायिक होण्यासाठी विषेश मदत झाली. मला इथला निसर्ग आणि लोकं खुप आवडली.” यावेळी प्रेक्षकांसोबत सेल्फि घेण्याचा मोह तिला आवरला नाही. यासोबतच सायली देवधर आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांनी महिलांशी संवाद साधला आणि एवढ्या भव्य कार्यक्रमासाठी आयोजकांचे आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी रायगड जिल्हा कार्याध्यक्ष हनुमंत पिंगळे, प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, प्रदेश सचिव भरतभाई भगत, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे,खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, कर्जत तालुका अध्यक्ष भगवानशेठ चंचे, जेष्ट नेते दत्तात्रय मसुरकर, महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला तालुकाध्यक्ष रंजना धुळे. आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रेडीओ जॉकी अक्षय याने केले तर आभार जगदीश देशमुख यांनी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.