प म पा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले शाळेचे उद्घाटन
आमच्या शाळेतून ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारखे विद्यार्थी घडतील असा मला विश्वास वाटतो
– चेअर पर्सन आरती कोठारी
पनवेल/ प्रतिनिधी
दोन दशकांहून अधिक वर्षे उत्कृष्ठ शिक्षण देण्यासाठी सुप्रसिद्ध असणारे कोठारी इंटरॅशनल स्कूलच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन येथील करंजाडे वसाहतीमध्ये संपन्न झाले. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते फीत कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी करांजाडे ग्राम पंचायतीचे सरपंच मंगेश शेलार आणि भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका उपाध्यक्ष बळीराम म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोठारी इंटरॅशनल स्कूल या शिक्षण संस्थेची पहिली शाळा नोएडा येथे गेल्या वीस वर्षांपूर्वी उभारली गेली. आय एस सी ई,आय बी,सी बी एस सी,केंब्रिज अशा विविध अभ्यासक्रम येथील शाळेत अंतर्भूत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून पुणे येथे दोन शाळा यशस्वीरित्या विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत आहेत.या व्यातरिक्त मुंबई मध्ये मालाड आणि प्रभादेवी येथे दोन प्री प्रायमरी शाळा कार्यान्वित आहेत.संपूर्ण अध्ययन प्रणाली असणारी चौथी शाळा करंजाडे येथे गुरुवार दिनांक १८ जानेवारी पासून कार्यान्वित झाली आहे.
उद्घाटनाच्या दिवशी या शाळेला पालक वर्गाचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला दिसत होता. शेकडो पालक विद्यार्थ्यांसह प्रवेश अर्ज प्राप्त करण्यासाठी येथे जमले होते. शिक्षण संस्थेच्या चेअर पर्सन आरती कोठारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की,जवळपास सहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आमची संस्था शिक्षण देत आहे. करंजाडे मधील मुलांचे उज्वल भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही येथे शाळा स्थापन करत आहोत. संपूर्णपणाने वातानुकूलित यंत्रणेने सज्ज शाळा,आय टी केंद्रित शिक्षण, रोबोटिक्स हे सारे येथे असेल.
शिक्षण प्रणालीमध्ये जे जे नव्याने अंतर्भूत केलं जातं ते आमची शाळा नेहमीच अभ्यासक्रमात समाविष्ट करत असते. सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण आम्ही देत असल्याने
आमच्या शाळेतून ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारखे विद्यार्थी घडतील असा मला विश्वास वाटतो. व्हाइस चेअर मन मितेश कोठारी म्हणाले की करंजाडे वासीयांसाठी एक हक्काची शाळा सुरू करत आहोत. सी बी एस सी अभ्यासक्रमाद्वारे आम्ही येथील शाळेची सुरुवात करत आहोत. लवकरच नोएडा येथील शाळेप्रमाणे येथे केंब्रिज आणि आय बी अभ्यासक्रम देखील सुरू होतील. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आद्ययावत बसची सुविधा देखील आम्ही प्रदान करणार आहोत.
कोठारी इंटरनॅशनल स्कूल या संस्थेचे चेअरमन दिपक कोठारी यांनी समस्त पालकांना आवाहन केले की तुमच्या येथे शिकत असताना त्याची प्रगती पाहून निश्चितच तुम्ही एका दिवशी सांगाल की आमचा पाल्य कोठारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. उद्घाटनानंतर आपली प्रतिक्रिया देताना आयुक्त गणेश देशमुख म्हणाले की भविष्यात करंजाडे वसाहत ही खारघर प्रमाणे विकसित होणार आहे. एका चांगल्या शाळेची या ठिकाणी गरज होती. कोठारी इंटरनॅशनल स्कूल ने ती गरज पूर्ण केली त्याबद्दल सर्व संचालकांचे मी आभार मानतो तसेच यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. सर्वसमावेशक विचार करून त्यांनी शुल्क आकारावे जेणेकरून आमच्याकडे कमीत कमी तक्रारी आमच्याकडे येतील.
Be First to Comment