पनवेल/ प्रतिनिधी
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.एकीकडे संपूर्ण देशभरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुहूर्तावर दिवाळी साजरा करायचा मानस आहे तर दुसरीकडे हिंदुत्व विरोधी शक्तींनी अनाठायी समाज मन दूषित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हिंदुत्व विरोधी शक्तींनी या भव्य सोहळ्याचा धसका घेतला असल्यामुळे कुठेतरी गालबोट लावण्याचा त्यांचा प्रयत्न देखील असणार आहे.
देशात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज झालेले आहे. तरी देखील कित्येक दशकांच्या प्रतीक्षेनंतर येणारा हा सुवर्णसोहळा हा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी पनवेलमध्ये श्रीराम नाम जप संकल्प समिती यांच्यावतीने तब्बल ३८ मंदिरांमध्ये १५ जानेवारीपासून २२ जानेवारी पर्यंत रोज सायंकाळी सात ते साडेसात या दरम्यान श्रीराम नाम जप केला जाणार आहे.न भूतो न भविष्यती असा प्राणप्रतिष्ठा सोहळा विघ्नविरहित पार पडावा यासाठी जास्तीत जास्त प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तांनी श्रीराम नाम जपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.
२०१९ च्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील वादग्रस्त जागेवर ट्रस्टद्वारे राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा केला होता. नवीन मशिदीच्या बांधकामासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते. बाबरी मशीद ज्या वादग्रस्त जागेवर उभी होती ती 2.77 एकर जागा केंद्र सरकारकडे राहील आणि निकालानंतर तीन महिन्यांच्या आत मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येईल, असा निकाल न्यायालयाने दिला होता.
श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्न पणाने पार पडण्यासाठी सामूहिक राम नाम जपाचे आयोजन
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment