पनवेल/ प्रतिनिधी
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज, पनवेल आणि श्री लक्ष्मनारायण मंदिर न्यास यांच्या श्री लक्ष्मी नारायण मंदिर जिर्णोद्धाराचा तिसरा वर्धापन दिन बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाला.वर्धापन दिनानिमित्त सकाळी श्री सत्नारायणाच्या पूजेचे आयोजन केले होते तर सायंकाळी रेवदंडा येथील ह. भ. प. संदीप बुवा वामन केळकर यांचे सुश्राव्य नारदीय कीर्तन सादर करण्यात आले. सुप्रसिद्ध उद्योगपती राजुशेठ गुप्ते आणि त्यांच्या पत्नी मुक्ताताई गुप्ते यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
सुप्रसिध्द उद्योगपती राजूशेठ गुप्ते यांनी त्यांच्या मातोश्री श्रीमती कांताबाई कृष्णकांत गुप्ते यांच्या इच्छेनुसार श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे जिर्णोद्धार बांधकाम स्वखर्चाने पूर्ण करून दिले.१० जानेवारी २०२१ रोजी जीर्णोद्धार झालेल्या मंदिरामध्ये श्री लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती.प्रतिवर्षी याच दिनी जीर्णोद्धारपूर्ती वर्धापन दीन सोहळा साजरा करण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस आहे.
जिर्णोद्धारपूर्ती सोहळ्याच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज, पनवेल चे विश्वस्त श्री व सौ.श्रीकृष्ण चित्रे यांच्या हस्ते सकाळी श्री सत्यनारायण पूजन संपन्न झाले.तर सायंकाळी रेवदंडा येथील ह भ प संदीप बुवा वामन केळकर यांचे सुश्राव्य नारदिय कीर्तन सादर करण्यात आले.ज्येष्ठ हार्मोनियम वादक ह भ प नंदकुमार कर्वे यांनी हार्मोनियम वर तर तबल्यावर शार्दुल डोंगरे यांनी त्यांची उत्तम साथ केली. केळकर यांनी सादर केलेल्या सुमधुर आवाजातील कीर्तनाने श्री लक्ष्मीनारायण मंदिर सभामंडपातील उपस्थित श्रोते भक्तीरसात न्हाऊन निघाले.समाजातील विविध मान्यवरांनी तसेच श्री लक्ष्मीनारायणाच्या शेकडो भक्तांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.विविध रंगी विद्युत माळांच्या सजावटीचेमुळे मंदिर नेत्रदीपक दिसत होते.कळसावर केलेल्या रंगीबेरंगी विद्युत झोत रोषणाईने मुळात सुंदर असणारा कळस आणखीनच खुलून दिसत होता.
वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे अध्यक्ष योगेश राजे,सचिव गिरीष गडकरी, सहसचिव नीलिमा गडकरी, खजिनदार महेश कर्णिक, विश्वस्त मिलिंद देशपांडे,संदीप देशमुख,श्रीकृष्ण चित्रे,कविता चित्रे,संतोष देशपांडे,राहुल देशपांडे, क्रांतीकुमार कुलकर्णी,आशिष चौबळ,गौरी राजे यांच्यासह अन्य ज्ञाती बांधव सहभागी झाले होते.
Be First to Comment