नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाने पनवेल ते कल्याण एसी वोल्वो बसेस १ जानेवारीपासून सुरू केल्या आहेत. दिवसभरातून या गाड्यांच्या चाळीस फेऱ्या असतील. पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेरून सदरहू गाड्या सुटणार असून त्या एमआयडीसी मार्गे प्रवास करतील.एन एम एम टी प्रशासनाने या उपक्रमाला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे कळविले आहे.या गाड्यांचे प्रवास भाडे अत्यंत वाजवी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. न्यूनतम प्रवास भाडे ९ रू.असून पनवेल ते कल्याण प्रवास भाडे ६० रू.आहे.
पनवेल कल्याण मार्गावर एम आयडी डी सी मधील कर्मचाऱ्यांना प्रवासाची चांगली मुभा मिळते. त्यातच अल्प प्रवास भाड्यात वातानुकुलित प्रवास करता येणार असल्यामुळे प्रवाशांसाठी एसी वोल्वो बसेस नववर्षाची भेट ठरत आहेत.
पनवेल कल्याण प्रवास आता वातानुकूलित
More from UncategorizedMore posts in Uncategorized »
Be First to Comment