अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर पूर्णत्वास येत असून २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते विलास तावडे यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पनवेल येथील निवासस्थानी येऊन दिले. या वेळी ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, शकुंतला ठाकूर, अमोघ ठाकूर उपस्थित होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विलास तावडे यांचे स्वागत व सन्मान केला.

Be First to Comment