पनवेल विधानसभा क्षेत्रात गुंजणार ‘नमो चषक’
‘
पनवेल /प्रतिनिधी
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘नमो चषक’ स्पर्धा होणार आहेत. त्या अनुषंगाने कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रात भव्य क्रीडा, कला व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत खारघर मॅरेथॉन, क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, सायक्लोथॉन, कॅरम, खो- खो, बुद्धिबळ या क्रीडा स्पर्धा तसेच नृत्य, चित्रकला, गायन, वक्तृत्व या कला स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. ‘नमो चषक’ अंतर्गत शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी खारघर येथे सायक्लोथॉन आयोजित करण्यात आले आहे. तर १५ जानेवारीपासून खुल्या गटातील दिवस रात्र भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा कळंबोलीच्या प्रशस्त मैदानावर होणार आहे. प्रवेश विनामूल्य असून सर्व खेळाडूंना आकर्षक टी- शर्ट देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघास १ लाख रुपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सहभाग नोंदविण्याची अंतिम तारीख १० जानेवारी असून त्यासाठी तेजस जाधव-९५९४९४५०८९, विकी टेकवडे – ८३६९८८३०१० किंवा आयुष मळेकर-९१३७२९८४८४ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी व माहितीसाठी https://namochashak.in
या संकेत स्थळाला भेट द्यावी.
Be First to Comment