सरपंचपदाचे 2, तर सदस्यपदासाचे 6 अर्ज अवैध
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
तालुक्यातील सात ग्रामपंचायततीच्या सार्वत्रिक आणि एक ग्रामपंचायतीं मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट सरपंच पदासाठी 40 तर 67 सदस्य पदासाठी तब्बल 229 अर्ज दाखल झाले होते. तर कळंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. आज दि.23 ऑक्टोबर रोजी छाननी झाली छाननीत सरपंच पदातील 2 अर्ज अवैध तर सदस्या मधील 6 अर्ज अवैध ठरले आहेत.
तालुक्यातील नसरापूर, वदप, गौरकामत, ओलमण, अंभेरपाडा, खांडस आणि नांदगाव या सात ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच आणि सदस्य पदाची निवडणुक आहे. आज 23 ऑक्टोबर रोजी छाननी होती. सरपंच पदाच्या अर्जातील वदप, ओलमण ग्रामपंचायती मधील एक – एक असे 2 अर्ज अवैध ठरले तर सदस्य पदासाठीच्या वदप -एक, ओलमण-एक, खांडस -तीन, नांदगाव -एक ग्रामपंचायती मधील असे 6 अर्ज अवैध ठरले आहेत. आता सरपंच पदासाठी 38 तर सदस्यासाठी 225 अर्ज राहिले आहेत. 25 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Be First to Comment