कर्जत तालुक्यात ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी चाळीस तर सदस्यपदासाठी 231 नामांकन अर्ज
सिटी बेल ∆ कर्जत ∆ विजय मांडे ∆
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि दोन ग्रामपंचायत मधील रिक्त असलेल्या दोन जागांसाठी पोटनिवडणूकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी होत आहे.सात ग्रामपंचायत मधील थेट सरपंच पदाच्या सात आणि सदस्य पदाच्या 67 जागांसाठी नामांकन अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. थेट सरपंचपदासाठी चाळीस आणि सदस्य पदांसाठी 231 नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.
सर्व ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी बहुरंगी लढती होणार असून या ग्रामपंचायती यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या आघाड्या आणि युत्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्याचे बदललेले राजकारण आणि कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने निर्माण झालेले राजकारण यामुळे मतदार सुन्न झाला आहे.
कर्जत तालुक्यातील नसरापूर, वदप, गौरकामत, ओलमन, अंभेरपाडा, खांडस आणि नांदगाव या सात ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आल्याने त्या सात ग्रामपंचायतीमध्ये 5 नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे.या सात ग्रामपंचायत मध्ये थेट सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याची काल 20 ऑक्टोबर हि शेवटची तारीख होती. यावेळी तीन ऐवजी पाच वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली होती. थेट सरपंच पदासाठी चाळीस तर सदस्य पदांसाठी 229 नामांकन पत्र दाखल झाली आणि कळंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी दोन नामांकन पत्र दाखल झाली आहेत. अशी एकूण 231 नामांकन अर्ज दाखल झाली आहेत.
तालुक्यातील ओलमन, नसरापूर, खांडस या ग्रामपंचायती मोठ्या असल्याने आहेत. राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचे निर्माण झालेले चार गट निर्माण झाले आहेत. त्याचे परिणान या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दिसून येत आहेत. मात्र सर्वसामान्य मतदार विचार करू शकत नाही अशा आघाड्या आणि युत्या या निवडणुकीत पाहायला मिळत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नसरापूर मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव थेट सरपंच आणि सदस्य पदाच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर वदप मध्ये सदस्यांच्या नऊ जागांसाठी आणि सर्वसाधारण महिला राखीव सरपंच पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. गौरकामत ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी आणि अनुसूचित जमाती महिला राखीव थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. ओलमन ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जमाती महिला राखीव सरपंच पॅड तसेच अकरा सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. अंभेरपाडा ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदाचा सात जागांसाठी आणि अनुसूचित जमाती महिला राखीव थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. खांडस ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जमाती थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असून तेथे अकरा जागांसाठी सदस्य निवडले जाणार आहरेत. तर नांदगाव ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदाच्या नऊ जागांसाठी निवडणूक होणार असून तेथील थेट सरपंच पद हे अनुसूचित जमाती राखीव आहे.
थेट सरपंच पदासाठी पहिल्या पाच दिवसात केवळ 15 नामांकन अर्ज तर शेवटच्या दिवशी 25 नामांकन अर्ज दाखल झाले तर सदस्य पदासाठी पहिल्या पाच दिवसांत 119 तर शेवटच्या दिवशी तब्बल 112 नामांकन अर्ज दाखल झाले.

Be First to Comment