विरोधकांनी आयुष्यभर विकासकामात अडथळे आणण्याचेच काम केले : माजी सरपंच राजेश मोकल यांचा विरोधकांवर निशाणा
सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆
पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायतीत विकासात्मक दृष्टिकोनातून गेल्या अनेक वर्ष कामे केली असून मात्र या कामांना विकासकामात अडथळे आणायचे धंदे विरोधकांनी आयुष्यभर केले असल्याचे वडखळ ग्राम पंचायतीचे माजी सरपंच राजेश मोकल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आमच्या सरपंच पदाच्या उमेदवार पुजा राजेश मोकल यांचे शिक्षणच या गावात झाले असून त्याना या गावाची जाण आहे.त्यांनी केलेल्या चांगल्या कामांमुळे सन 2005 मध्ये पुजा मोकल यांना जनतेने पंचायत समितीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून दिला त्या नंतर मी सरपंच असताना देखील त्यांनी माझ्या सोबत राहुन अनेक धोरणात्मक कामे काय असतात ती जवळून पाहिली आहेत. त्यामुळे वडखळ गावाचा विकास तोच आमच्या कुटुंबाचा ध्यास असल्याने विजयाची नांदी आमची आहे.विरोधक नुसते विकास कामांमध्ये खो घालण्याचा काम करीत असतात हे वडखळच्या सर्व जनतेने पाहिले आहे.त्यामुळे या 2023 च्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रशासनाचा दांडगा अनुभव असणाऱ्या थेट सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी श्री क्षेत्रेश्वर विकास आघाडीच्या पुजा राजेश मोकल व अन्य सदस्य उभे आहेत आमचा विश्वास आहे या निवडणुकीतही जनता आमच्या पाठीशी ठाम असून श्री क्षेत्रेश्वर विकास आघाडीचे सर्व उमेदवार बहुसंख्य मताने निवडून येतील असे त्यांनी शेवटी सांगितले.
Be First to Comment