करंजाडे चे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा वाढदिवस साजरा
सिटी बेल ∆ करंजाडे ∆
काही तरी वेगळ करणारी माणस हे वेगळी असतात त्यांचे ध्येय, तत्व, विचार जरा हटके असतात, त्यामध्ये असे व्यक्तीमत्व असणारे करंजाडे ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर माजी सरपंच रामेश्वर आंग्रे. काही व्यक्तींच्या रक्तातच मुळात लढवय्यापणा आणि संघर्ष करण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे अशी मंडळी आव्हानाला आव्हान करून सामोरे जातात. त्याप्रमाणे “साहेबांना उदंड आयुष्य लाभावं, नगरसेवक व्हावेत असे मत बुधवारी ता.19 रोजी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वाढदिवसानिमिताने शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी उदघाट्न प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील यांनी शिबिराला भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गणेश कडू पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, मा.उपसरपंच योगेंद्र कैकाडी, संदीप चव्हाण उपशहर प्रमुख उद्धव ठाकरे गट, मा.सदस्य मंगेश बोरकर, नीलम भगत, हेमा गोतमारे, अर्चना रसाळ, आशा केरेकर, झीजाडे मॅडम, नसीम दीदी, बबन गायकर, भरत राणे, चंद्रकांत आंग्रे, रमेश आंग्रे, संतोष पाडेकर, माणिक गायकर, सुरेश भोईर, किशोर भोईर, संदीप नागे, उमेश भोईर, योगेश राणे, केतन आंग्रे, विजय आंग्रे यांच्यासह करंजाडे सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास मंडळ, महिला सदस्य यांच्यासह जेष्ठ नागरिक, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.
करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या वडिलांचे महिन्याभरापूर्वी दुःखद निधन झाले असल्याने रामेश्वर हे दुःखामध्ये होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रह व उत्साहामुळे आरोग्य शिबीर व सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले. त्यानुसार शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोळे तपासणी, रक्त तपासणी, इसीजी तपासणी, शुगर, रक्त तपासणी तंज्ञाकडून करण्यात आली. यामध्ये 150 जणांनी लाभ घेतला.
यावेळी आरोग्य शिबीर कॅम्प व्यवस्थापक जनसंपर्क अधिकारी रत्नमाला पाबरेकर, डॉ. विश्रांती मोकळ, साक्षी सिस्टर, मेहनाज, नारायण यांनी आरोग्य शिबिरात सहकार्य केले. वाढदिवसानिमित्ताने त्याचबरोबर सामाजिक उपक्रमामध्ये शालेय विध्यार्थीना वह्या वाटप करण्यात आले. तसेच वसाहतीतील सोसायटीना बसण्यासाठी बेंचेस वाटप करण्यात आले.
यावर्षी घरामध्ये दुःख असल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले होते. मात्र कार्यकर्ते, मित्र परिवार यांच्या आग्रह व उत्साहामुळे आरोग्य शिबीर व सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
– रामेश्वर आंग्रे – मा.सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत
Be First to Comment