Press "Enter" to skip to content

नारायणशेठ नवे सभापती

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे नारायण शेठ घरत यांची निवड

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शेकापचे नारायणशेठ घरत आणि उपसभापती पदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व १७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शेकाप महाविकास आघाडीची एक हाती सत्ता स्थापन झाली आहे.

या सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या कार्यक्रमाला आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, माझी सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका सचिव गणेश कडू, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार जयंतभाई पाटील यांनी सांगितले ज्याप्रमाणे महाराष्ट्रात महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. त्याचप्रमाणे पनवेल आणि उरण मतदार संघामध्ये महाविकास आघाडी भक्कमपणे काम करेल. आणि पनवेल आणि उरण विधानसभा एकत्रितपणे लढवून ते जिंकून आणू असे सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आमचे सरकार येणार असे ठामपणे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात आघाडी करत असताना आम्ही नेहमी आमचे सहकारी राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना सन्मानाची वागणूक दिली जाते.

यावेळी माजी आमदार बाळा पाटील यांनी सांगितले पनवेल आणि उरण विधानसभा तसेच पनवेल महानगरपालिका आम्ही महाविकास आघाडीच्या मार्फत एकत्र लढवून या दोन्ही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निश्चितच विजय खेचून आणेल असा विश्वास बोलून दाखवला . त्याची सुरुवात आपण पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीतला विजय, आणि आज पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्ष्मीच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले 17 सदस्य.

यावेळी काँग्रेसचे पनवेल शहर अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले, जर आमच्या काँग्रेस पक्षातील कोणी प्रसार माध्यमांना काही माहिती सांगत असतील तर ते त्यांचे वैयक्तिक मत असून त्याचा या महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. आमचे वरिष्ठ जे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीमध्ये जोमाने काम करू.

यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते सभापती नारायण शेठ घरत उपसभापती सुनील सोनावळे, सदस्य देवेंद्र गंगाराम मढवी, अशोक गणू गायकर, मच्छिंद्रनाथ गणा पाटील, बाळकृष्ण नारायण पाटील, महादू गोपाल पाटील, अर्जुन पांडुरंग गायकर, सौ ललिता गोपीनाथ फडके, सखाराम गंगाराम पाटील, देवेंद्र अनंत पाटील, सोमनाथ जनार्दन म्हात्रे, दिनेश ज्ञानेश्वर महाडिक, आतिश दत्ता पाटील, काँग्रेस पक्षाचे रामचंद्र आत्माराम पाटील, आणि शिवसेनेचे प्रताप चंद्रकांत हातमोडे यांचा सत्कार करण्यात आला.

शेतकरी कामगार पक्ष हा कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज झालेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदी सुनील  सोनावळे यांची निवड करण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.