Press "Enter" to skip to content

शिवसेना – भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई

अलिबाग – रोहा रस्त्याचे श्रेय लाटण्याचा खोटारडेपणा खपवून घेतला जाणार नाही : मानसी दळवी

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

विद्यमान सरकारमधील स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या सततच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाल्यानंतर अलिबाग बेलकडे वावे रोहा या मुख्य रस्त्याचे काम नवीन ठेकेदरामार्फत सुरु करण्यात येत आहे. मात्र, कालपरवा मित्रपक्षात प्रवेश करणारी लोक या कामाचे श्रेय घेण्याचा खोटारडेपणा करीत आहेत. या कामाशी काहीही सबंध नसताना स्थानिक आमदारांना डावळून भाजपाचे दक्षिण उपजिल्हाप्रमुख दिलीप भोईर यांनी भूमिपूजन केले होते, असा खोटारडेपणा कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेना (शिंदेगट) च्या नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांनी दिला आहे.

मानसी दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी, ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे अधिकृत भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मानसीताई दळवी यांनी श्रेय लाटणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, महेंद्र दळवी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अलिबाग-रोहा रस्त्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे महत्वपुर्ण काम केले होते. तीन वर्षापुर्वी अगरवाल या ठेकेदारास पावणे दोनशे कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश देण्यांत आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. या कामाचे सुमारे 18 कोटी रुपये अॅडव्हान्स म्हणून अगरवाल कंपनीला देण्यांत आले होते. परंतु काही कारणात्सव अगरवाल कंपनीने हे काम न करता पळ काढला. त्यानंतर दुसरा कंत्राटदार ब्लॅकलिस्टमध्ये गेल्याने त्यालाही हे काम पुर्ण करता आलेले नव्हते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने पाठपुरावा करुन, हे काम सुरु करण्यात करण्यात यश मिळवले. मात्र, याचे श्रेय भाजपाचे दक्षिण उपजिल्हाध्यक्ष दिलीप भोईर घेत आहेत. वास्तविक या कामाशी दिलीप भोईर यांचा कोणताही सबंध नसताना ते हिरोगिरी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारचा चोराटी काम करणाऱ्यांना शिवसेनेचे कार्यकर्ते योग्य वेळी धडा शिकवतील असेही मानसी दळवी यांनी सूचित केले.

बेळकडे येथे अधिकृत भूमिपूजन करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत ठिकरे उपस्थित होते. हे काम निर्धारित वेळेत आणि चांगल्या दर्जाचे होईल, अशी ग्वाही दिली आहे.

महेंद्र दळवी हे विद्यमान सरकारमध्ये असल्याने त्यांनी या कामाचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध केलेला आहे. या
कामाचे श्रेय अनेक राजकीय प्रतिनिधी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी स्वत: निधी उपलब्ध करुन आणावा व श्रेय घ्यावे. अलिबाग मुरुड मतदार संघात मोठया प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. स्थानिक आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विकास कामांचा झंझावात पाहता, काही राजकीय मंडळी पाठपुरावा केल्याचे नाटक करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
– राजा केणी, शिवसेना जिल्हा प्रमुख- रायगड

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचे स्वरुप
कामाची लांबी – 85/630 किलोमीटर
निविदा रक्कम- 177.78 कोटी
कामाचा कालावधी- 24 महिने
नेमणुकीचा दिनांक- 25/11/2011

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.