Press "Enter" to skip to content

दुकाने व आस्थापनांवर मराठी नामफल लावण्याची शिवसेनेची मागणी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆

मराठी अस्मिता जपण्यासाठी दुकाने व आस्थापनांच्या नामफलकांवर मराठी भाषेत नाव असलेच पाहिजे या मागणी शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात शिवसेना पक्षाच्य शिष्टमंडळाने पनवेल महापालीकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

बॉम्बे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट अमेंडमेंट ऍक्ट 2022 च्या अंतर्गत व महाराष्ट्र राज्याचे 17 मार्च 2022 च्या अधिनियमनुसार, प्रत्येक दुकानावर व आस्थापनांवर मराठी पाटी असणे गरजेचे आहे. ह्या जी. आर ची प्रत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांना सादर केली.

ह्या अधिनियमानुसार प्रत्येक दुकानावर, आस्थापनांवर, दर्शनीय जागेवर मराठी भाषेतली, नाम फलक हे अनिवार्य केले गेले आहे. तसेच मराठी भाषेतली नावाची, अक्षरे, इंग्रजी नावातील अक्षरे पेक्षा छोटी नसावी हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. सरकारने अध्यादेश काढल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रा मधील, व्यवसायकांनी, या अधिनियमाचे तंतोतंत पालन करावे, असे अपेक्षित होते . मात्र, आजही बरेच दुकाने, हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, उपहारगृहे, इत्यादी या नियमांचे पालन न करता, पायमल्ली करीत आहेत असा आढळत आहे.

शिवसेना पक्ष (पनवेल विधानसभा) च्या वतीने, आयुक्तांच्या बैठकीत प्रत्येक दुकानदाराने/ आस्थापना संचालकने , ठळक पद्धतीचे, मराठीत नाव असलेले , नामफलक पाटी,दर्शनीय भागात लावण्याबाबत आपण, त्वरित रिक्षा ध्वनि यंत्रणा द्वारे दवंडी पिठवावी, शासनाने, नियमित केल्याप्रमाणे जी दुकाने व आस्थापना, मराठी नामफलक लावत नसल्यास, दंड आकारावा, मराठी भाषा दिनानिमित्त, मराठी भाषा अस्मिता जपण्याकरिता , सांस्कृतिक कार्यक्रम, पनवेल महानगरपालिका हद्दीत राबवावे अश्या मागण्या केल्या आहेत तसेच 26 फेब्रुवारी 2023 हा मराठी भाषा दिन असून, शिवसेना पनवेल विधानसभा कार्यकर्ते, दुकानांवर व आस्थापनांच्या मराठी पार्टी न लावणाऱ्यांवर, आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे इशारा हि यावेळी देण्यात आला.

या बैठकीमध्ये पनवेल महानगरपालिका च्या वतीने आयुक्त गणेश देशमुख, उपयुक्त गणेश शेटे उपस्थित होते. आयुक्तांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद देऊन, लवकरच पनवेल महानगरपालिका, सर्व दुकानदारकांना या बाबतचे परिपत्रक काढण्याचे आश्वासन, शिवसेना पनवेल पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी शिवसेना पनवेल पक्षाकडून, संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक मंगेश रानवडे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनवणे, पनवेल उप शहर प्रमुख मच्छिन्द्र झगडे, पनवेल विधानसभा महानगर संघटक मंगेश सुधाकर रानवडे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.