तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, शहर महिला अध्यक्षा निकिता पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे शिवसेनेते जाहीर प्रवेश
सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆
पेण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पडले असून मनसेचे पेण तालुकाध्यक्ष रुपेश पाटील, महिला शहर अध्यक्षा निकिता पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशात महिला तालुका अध्यक्ष रेखा तांडेल, रायगड जिल्हा युवा अध्यक्ष निकेश पाटील, पेण शहर अध्यक्ष आदित्य कदम, तालुका उपाध्यक्ष हनुमान नाईक, सचिन भोईर, तालुका सचिव हिरामण जेधे, हमरापूर विभाग अध्यक्ष साहिल म्हात्रे, पूर्व विभाग अध्यक्ष ओमकार कचरे, वडखळ विभाग अध्यक्ष रोहित पाटील, कासू विभाग अध्यक्ष धनाजी पाटील, वाशी विभाग अध्यक्ष हिरामण पाटील आदी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह शकडो शाखा प्रमुख, गाव प्रमुख व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेशाप्रसंगी आमदार महेंद्र दळवी म्हणाले की शेकापक्षाचे अस्तित्व आता संपत चालले आहे. शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत त्याची प्रचिती आपल्याला पाहता आली. येत्या आठवड्यात शेकापक्षाचं पेण तालुक्यातील अस्तित्वही संपुष्टात येऊन नेतेमंडळी शिवसेनेमध्ये येत आहेत.जिल्ह्यातील अनेक पक्षातील नेतेमंडळी प्रवेश करायला इच्छुक आहेत.येणा-या सर्वांना सन्माची वागणूक देण्यात येणार असून रुपेश पाटील सारख्या युवा कार्यकर्ता मिळाल्याने त्यांचे कार्य खुप मोठे आहे त्यामुळे त्याने जिल्ह्याचे मानाचे पद देण्यात येणार असल्याचे सांगितले.
तर रुपेश पाटील यांनी बोलताना मनसे जिल्हा अध्यक्ष यांच्यावर जहरी टीका करीत पेण मध्ये मनसेतील पक्षांतर्गत राजकारणामुळे कंटाळून अखेर मी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे सांगितले. यापुढे शिवसेना पक्ष वाढीसाठी पुर्ण ताकदीने काम करणार असून आमदार दळवी यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, राजा केणी, तुषार मानकवळे, राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष महेश पोरे, अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्ल मोरे, युवासेना संजय म्हात्रे, पेण विधासभा संघटक राहूल पाटील, बाळा म्हात्रे, तालुका संपर्क प्रमूख यशवंत मोकल, महिला आघाडीच्या अंजली जोगळेकर, शैलेश चव्हाण आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Be First to Comment