सिटी बेल ∆ मुंबई ∆
राज्यातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनाच्या परिसरात आमदार बाळाराम पाटील,आमदार सुधीर तांबे, आमदार अभिजित वंजारी, आमदार जयंत आसगावकर, आमदार किशोर दराडे यांनी पक्षाचे झेंडे बाजूला सारत आंदोलन केले.
– सन २०१२-१३ च्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग, तुकड्यांना शंभर टक्के अनुदान लागु करणे.
– अघोषित प्राथमीक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना निधीसहीत घोषित करणे.
– अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान लागू करणे.
– घोषित त्रुटी पात्र शाळेचा शासननिर्णय निर्गमित करणे.
– विनाअनुदानित व अंशअनुदानित शिक्षकांना सेवासंरक्षण लागू करणे.
– २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे.
– वाढीव पदांना अनुदान मिळालेच पाहिजे.
राज्यातील शिक्षकांच्या या व अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
शिक्षकांना न्याय मिळायलाच पाहिजे, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, यावर आम्ही ठाम आहोत असा निर्धार यावेळी या आमदारांनी व्यक्त केला.
Be First to Comment