राज्यात उष्णतेच्या लाटेचा मोठा इशारा ! वाचा उष्णतेची लाट कुठे येणार ?
सिटी बेल • मुंबई •
मार्च महिन्याची अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस खूप ऊष्ण आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम-मध्य महाराष्ट्रात काही भागांत – पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे – या कालावधीत संपूर्ण राज्यात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

उष्णतेची लाट कुठे येणार ?
▪️ हवामान विभागाने सांगितले , राज्यात सर्वच ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
तर ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत नगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत उष्णतेची लाट तीव्र असेल.
तसेच २९ ते ३१ मार्च या कालावधीत अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांत, ३१ मार्चला चंद्रपूर, तर ३०, ३१ मार्चला वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल.








Be First to Comment