संपाबाबत उर्जामंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा : संप आतापासून मागे घेण्याचा निर्णय
सिटी बेल • मुंबई •
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंते,अधिकारी संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार कृती समिती यांची आज उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी यशस्वी चर्चा झाली. या चर्चेनंतर संप आतापासून मागे घेण्याचा निर्णय मोहन शर्मा (वीज कर्मचारी संघर्ष समिती) यांनी जाहीर केला.

खालील मागण्यांवर झाली चर्चा आणि निर्णय
– खाजगीकरण होणार नाही लेखी स्वरूपात संघटनेला कळवलं
– संपकाळातील कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नाही
– खाजगीकरण करणार नाही,ती अफवा
– हायड्रोपॉवर स्टेशन खाजगीकरण चर्चा करणार
– जलसंपदा खात्यासोबत चर्चा करणार याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंधारण मंत्री यासोबत ऊर्जामंत्री चर्चा करणार
– बदली धोरण रिव्ह्यू करणार
– कंत्राटी कामगारांना नोकरी संरक्षण
– नोकरभरतीत कंत्राटी कामगारांना प्राधान्य
– केंद्राच्या भांडवलशाही धोरणाला आमचा विरोध
– राज्य सरकार आपला लेखी विरोध केंद्राला कळवणार
– सध्या खाजगीकरण प्रस्ताव नाही मात्र,राज्य सरकार खाजगीकरण विरोधात
– 2003 चं केंद्र धोरण खाजगी भांडवलदारांना फायद्याचं या बिलाला आमचा विरोध कारण वीज बिल दरआकारणी,खाजगी कंपन्या काहीही करू शकतील म्हणून विरोध
– मेस्मा कारवाई मागे घेऊ असं उर्जाममंत्र्यांचं आश्वासन
– थकबाकी वसुली साठी कर्मचारी संघटनेची मदत उर्जा मंत्र्यांनी मागितली









Be First to Comment