मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे राजे गायकवाड़ यांचे आवाहन
सिटी बेल • बडोदा • समीर बामुगडे •
बडोदा येथे हिंद मराठा महासंघाच्या राष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटन बडोद्याचे राजे उज्ज्वलसिंह गायकवाड आणि महाससंघाचे संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी गायकवाड यांच्या हस्ते राजे सयाराजीराव गायकवाड आणि शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळच्या आयोजित कार्यक्रमामध्ये उज्ज्वल सिंह गायकवाड यांनी देशभरातील सर्व मराठा समाजातील लोकांना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी राजे सयाराजीराव गायकवाड आणि छत्रपती शिवरायाचे शौर्य आणि विचारसरणी यांचे अनुकरण करित समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तर हिंद मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी मराठा सामाजाचे बडोदा येथील हे राष्ट्रीय कार्यालय मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासातील प्रगतीचे पाऊल ठरेलं असे सांगून त्यांनी समाजाला शिवरायांच्या आदर्शवत राज्यकारभाराची आवश्यकता असलयाचे सांगितले. यावेळी उपस्थित मराठा बांधवानी छत्रपती शिवराय आणि सयाजीराव गायकवाड यांचा जयजयकार केला. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषनानि आसमंत दणाणून सोडला.
बडोदा येथील या राष्ट्रीय सोहोळ्यामध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नावर एकत्र येण्यावर सहमती दर्शवण्यात आली.शिवरायांचे पराक्रम आणि त्यांचे सुसंस्कृत आचार व विचाह्रांचे अनुकरण करने मराठा सामाजाच्या हिताचे आहे.हिंद मराठा महासंघाच्या मध्यमातून देशभरात मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकास प्रक्रियेच्या मुद्द्यावर या कार्यक्रमात विशेष भर देण्यात आला.यावेळी उज्ज्वलसिंह गायकवाड़ यांनी सदानंद भोसले यांना मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला.

या कार्यक्रमात संदीप भोसले यांनी बँकिंग क्षेत्रातून समाजाचा विकास करण्याचे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली तर तर ऍड. शिंदे यांनी मराठा समाजाच्या काही ऐतिहासिक बाबी उलगडून दाखवल्या. महासंघाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व प्रवक्ते तसेच जेष्ठ पत्रकार श्रीकांत चालके यांनी मराठा समाजाच्या तळागाळातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल होतकरू घटकातील लोकांच्या समस्या व विविध प्रश्नावर चिंता व्यक्त केली. समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर गावा गावातून, वस्त्यातून फिरून समाजाचे प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी हिंद मराठा महासनघाची समाजाविषयीची भूमिका विषद केली. आरक्षणासह मराठा समाजाचा उत्कर्ष साधण्याची आवश्यक्यता त्यांनी प्रतिपादन केली.
यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी आणि मराठा बांधवांना शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी गुजरात राज्याचे प्रमुख देवेश माने यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश शेडगे, राष्ट्रीय विधी सल्लागार अॅड दिनेश शिंदे,बडोदा महानगरपालिकेचे नगरसेवक शैलेश पाटील,राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे, राष्ट्रीय सल्लागार किशोर केसरकर, गुजरात राज्य प्रमुख देवेश माने,बडोदा जिल्हा प्रमुख प्रदिप मोरे, राष्ट्रीय सरचिटणीस रणजितसिंह चव्हाण,उद्योग सहकार व्यापार राष्ट्रीय अध्यक्ष संजय राव पवार,उद्योग रोजगार महाराष्ट्र प्रमुख संदिप राव भोसले, उद्योग व सहकार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल कदम, कोल्हापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील, राष्ट्रीय सल्लागार हेमंत शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष उद्योग व सहकार राजेंद्र आंब्रे, मुंबई प्रदेश महिलाध्यक्षा अॅड अश्विनी ताई भोसले,बडोदा महिला जिल्हाध्यक्षा प्रा.सौ.गार्गी राजे समरजीत सिंह गायकवाड,बडोदा शहर प्रमुख परिमल सोंडकर,पालघर जिल्हा प्रमुख संतोष सावंत, नवीमुंबई जिल्हाप्रमुख संजयसिंह देशमुख, महाराष्ट्र राज्य इ प्रविण साळुंखे, गुजरात राज्य सोशल मिडीया प्रमुख गौतमसिंह राजे गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते श्रीकांत चाळके, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेशराव पालांडे, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव येरुणकर, खेड तालुका प्रमुख राजेंद्र घाग,सुरत शहर प्रमुख राजु शेवाळे,सुरत जिल्हा प्रमुख संतोष मालुसरे,अभिजीत सांगळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भास्कर सुर्वे,एनकेजीएसबी सहकारी बँक लिमिटेड आशिर्वाद पॅनेलचे उमेदवार संचालक प्रेमानंद शानभाग,अनंत पै, अमितकुमार प्रभू,आदि मान्यवरांबरोबरच बडोदा शहरासह संपूर्ण देशभरातुन हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. काश्मीरा खैरे यांनी केले.








Be First to Comment