Press "Enter" to skip to content

बडोदे येथे १३ रोजी दिग्गज मराठा एकत्र येणार

मराठ्यांचे मोठे राष्ट्रीय संघटन : कार्यालयाचेही उद्घाटन

सिटी बेल | मुंबई |

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात सुरु झालेली मराठ्यांची संघटनात्मक चळवळ आता गुजरातमध्ये पोहोचली आहे. मराठ्यांचे राष्ट्रीय संघटन करण्यासाठी गुजरातमधील बडोदा शहरात देशभरातून दिग्गज मराठा 13 फेब्रुवारी रोजी एकत्र येणार असून हिंद मराठा महासंघाची स्थापणा करण्यात येणार आहे. याचवेळी राष्ट्रीय कार्यालयाचे उद्घाटनही होणार आहे.प्रथमच अशा संघटनात्मक कार्यामुळे महासंघाच्या या वैशिष्ट्यापूर्ण सोहोल्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

मराठा समाजाचे हे आता पर्यंतचे मोठे राष्ट्रीय संघटन आहे. देशभरातील मराठा समाजाची अस्मिता बुलंद करणार्या आणि मराठ्यांची निरपेक्ष भावनेने कार्य करू इच्छिणाऱ्या दिग्गज मराठा बांधवांनी समाज हिताला प्राधान्य देत मराठा समाजाचे मोठे राष्ट्रीय संघटन करण्याचे ठरवले आहे.

गुजरात मधील बडोदा येथील राजघराण्यातील उज्ज्वलसिंह गायकवाड आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा समाजाचे दिग्गज नेते सदानंदरावं भोसले यांच्या नेतृत्वाखाली 13 फेब्रुवारी 2022 रोजी बडोदा येथे ” हिंद मराठा महासंघ” या नावाने समस्त मराठा समाजाचे संघटन करण्यात येणार आहे. या महासंघाची स्थापणा यावेळी करण्यात येणार असून महासंघाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून श्री. सदानंदरावं भोसले तर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उज्ज्वलसिंह गायकवाड यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे.

याचवेळी येथील राष्ट्रीय कार्यालयाचे उदघाटन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सदानंदरावं भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातील समाज बांधवांसाठी पक्ष विरहित कार्य करून समाजातील प्रत्येक घटकांचा अभ्यास करण्याबरोबरच वैयक्तिक आणि सामुदायिक आर्थिक विकास साधण्यासाठी हिंद मराठा महासंघाची स्थापणा करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उज्ज्वलसिंह गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. यावेळी महासंघांचे संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले, राष्ट्रिय सरचिटणीस व प्रवक्ते ऍड श्री.किशोर बांदल देशमुख, राष्ट्रिय उपाध्यक्ष श्री. गणेश शेडगे आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

या सोहोळ्यासाठी गुजरात राज्य प्रमुख देवेश माने, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस व प्रवक्ते श्रीकांत चाळके, बडोदे जिल्हा प्रमुख प्रदीप मोरे, परिमल सोंडकर,महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक राजूशेठ आंब्रे, शिवाजीराव पालांडे, ॲड अश्विन कुमार भोसले, महेश पालांडे, राजेंद्र घाग, जयवंत पालांडे, बुवा जाधव, नंदकुमार शिर्के, विजय येरुनकर, अनिल मोरे, किशोर केसरकर, प्रविन साळूनखे, नवी मुंबईचे संजय पवार आदींसह शेकडो दिग्गज मराठा समाज बांधव पदाधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.