सय्यद अकबर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
सिटी बेल | पनवेल |
भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा साप्ताहिक कोकण डायरी चे संपादक सय्यद अकबर यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी अशा तीनही आघाड्यांवर नेत्रदीपक कामगिरी करून दाखविणारे सय्यद अकबर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी गर्दी केली होती.
ज्येष्ठ पत्रकार आणि क्रियाशील प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलच्या पत्रकार बांधवांनी सय्यद अकबर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सिटी बेल समूहाचे संपादक विवेक मोरेश्वर पाटील,समूह संपादक मंदार दोंदे, संजय कदम, किरण बाथम,सहील रेळेकर,विशाल सावंत,असीम शेख,चंद्रकांत शिर्के,केवल महाडिक,अनिल राय,साबीर शेख,अमजद खान,राज भंडारी,आशिष साबळे आदी पत्रकार बांधव शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
सय्यद अकबर यांच्या जन्मदिन सोहळ्याला माहिती विभाग संचालक दयानंद कांबळे, माहिती जनसंपर्क कोकण विभाग उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, माहिती जनसंपर्क कोल्हापूर विभाग उपसंचालक डॉक्टर संभाजी खराट यांची विशेष उपस्थिती होती.
सय्यद अकबर एक अष्टावधानी व्यक्तिमत्व म्हणून नावारूपास येत आहे. अल्पसंख्यांक समाजातील शोषित वंचितांचा त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी ते कायम झटत असतात. समाजातील अनिष्ट व अन्यायकारक रूढी-परंपरांवर त्यांचा लेखणे रूपी आसूड सातत्याने प्रकारे वाढत असतो. सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असणाऱ्या सय्यद अकबर यांच्या दीर्घ आयुष्य सुदृढ आरोग्य व यशस्वी वाटचालीसाठी तमाम उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.




Be First to Comment