Press "Enter" to skip to content

संजीव भांबोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ अध्यक्षपदी संजीव भांबोरे यांची नियुक्ती

सिटी बेल | समिर बामुगडे |

भंडारा-येथून जवळच असलेल्या पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते संजीव मुरारी भांबोरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर पोवार (कार्यक्षेत्र संपूर्ण भारत) यांनी जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स र्विदर्भ महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी संजीव मुरारी भांबोरे यांची नियुक्ती केली आहे.

जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ही संस्था एनजीओ असून नुकतेच या संस्थेला स्कॉटलंड ने या संस्थेची दखल घेऊन आय.एस.ओ .ने सन्मानित करण्यात आलेले आहे .संजीव भांबोरे हे वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांचे जीवनच संघर्षमय आहे .त्यांनी आपल्या जीवनात अनेकांना न्याय मिळवून दिलेला आहे.

ते फुले, शाहू ,आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज ,अण्णाभाऊ साठे, यांच्या विचारसरणीचे असून एखादी गोष्ट त्यांना पटली नाही तर स्पष्टपणे तोंडावर बोलणारी व्यक्ती आहेत. त्यांनी आपल्या जीवनात अनेक मोर्चे ,आंदोलने ,धरणे, उपोषणे , जेलभरो ,आंदोलने केलीत. परिस्थिती नाजूक असतानासुद्धा परिस्थितीवर मात करून आपले सामाजिक कार्य आज पर्यंत त्यांनी सुरू ठेवले आहे. 1999 पासून ते पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून ते पत्रकारितेच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत .

लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे. आज त्यांच्याकडे सत्य पोलिस टाईम्स उपसंपादक, पी. टीव्ही .न्यूज चैनल चे सहसंपादक ,दैनिक दंडाधिकार भंडारा जिल्हा प्रतिनिधी, दैनिक शिल्पकार भंडारा जिल्हा प्रतिनिधी ,मुंबई वार्ताहर प्रतिनिधी, सांजवार्ता प्रतिनिधी अशा अनेक यूट्यूब चॅनल ,पोर्टर ,डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया, क्षेत्रात सध्या कार्यरत असून ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आहेत .तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभागाचे संपर्कप्रमुख सुद्धा आहेत.

संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना सुद्धा न्याय देण्याचे काम करीत आहेत .आता त्यांच्यावर सामाजिक क्षेत्रातील जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स विदर्भ अध्यक्ष पदाचे जबाबदारी आली असून निश्चिततच या पदाला न्याय देतील यात शंका नाही. त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय सतीश लोखंडे औरंगाबाद अध्यक्ष जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्स ,संजय कदम अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,प्रतिभा पवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला विभाग ,युवराज पवार युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, डॉ .शोभा महाजन उपाध्यक्ष महिला आघाडी ,तुषार पाटील सचिव महाराष्ट्र राज्य, अरविंद कांबळे सचिव राज युवक महाराष्ट्र राज्य यांना दिलेली आहे .यात विदर्भातील भंडारा ,गोंदिया, चंद्रपूर , गडचिरोली , नागपूर, वर्धा ,अमरावती ,अकोला बुलढाणा, यवतमाळ-,वाशिम या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली असून या संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्ष यांची नव्याने नियुक्ती लवकरच करण्यात येत असून ज्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.

त्यांनी त्वरित 70 66 37 04 89 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे. त्यांच्या नियुक्तीबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी .आंबेगावे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे ,सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तुळशीराम गेडाम, सतीश सोमकुवर अध्यक्ष नागपूर विभाग मराठी साहित्य परिषद ,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे नागपूर विभाग सरचिटणीस जयेंद्र चव्हाण, नीरजाताई आंबेरकर कोकण विभाग अध्यक्ष जीवन आधार फाउंडेशन, जीवन आधार फाउंडेशनचे अरविंद कांबळे, दैनिक दंडाधिकारचे संपादक अर्जुन जाधव ,दैनिक शिल्पकार चे संपादक भूषण मोरे ,मुंबई वार्ताहर डिजिटल मीडिया चे संजय लांडगे ,डिजिटल मीडियाचे सांजवार्ताचे संपादक बिंबिसार सहारे ,यांनी व त्यांच्या महाराष्ट्रातील चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.