मोहोर आला वालाला अन घमघमलं सारं शेत
राया चला करू आता ‘ पोपटीचा’ फर्मास बेत
चिंब दवामध्ये भिजून गेली
भरास आली पिकं
त्यात आणखी दाटी करतय
हुळूहुळणारं धुकं
कवळ्या,नाजूक शेंगेला कुणी असंच सोडून देतं ?
राया चला करू आता पोपटीचा फर्मास बेत
विस्तव सारा आधीच फुलला
अंगांगाने रसरसला
भाजून घेऊ हंडी त्यातच
नको हात हो धसमुसळा
होऊन जाऊ द्या दमादमाने घाईने का कुणी घेतं?
राया चला करू आता पोपटीचा फर्मास बेत
दोघे आपण बांधावरती
चवीचविने खाऊ
गारठलेल्या मळावरती
फिरायला पण जाऊ
शेंग कोवळी अलगद घ्या हो असंच का कुणी नेतं ?
राया चला करू आता पोपटीचा फर्मास बेत
श्रीनिवास गडकरी
रोहा, पेण, पुणे.
09130861304
Be First to Comment