Press "Enter" to skip to content

प्रजासत्ताक दिनी वाडी धारकांना मिळाले जल उपसा सिंचन साहित्य

दीपक फर्टीलायझर अँड पेट्रोकेमिकल्स कोर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आला उपक्रम

बुधवार दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी ईशान्य फाउंडेशन मार्फत ३७ वाडी धारकांना जल उपसा सिंचनासाठी साहित्य वाटप करण्यात आले.तळोजा विभागामध्ये दीपक फर्टीलायझर  कंपनीच्या  सीएसआर उपक्रमांतर्गत व ईशान्य फाउंडेशन मार्फत सन २०१२-१३ पासून वाडी धारकांना सहकार्य करण्याचा कार्यक्रम राबवला जात आहे.या कार्यक्रमाचे मुख्य उद्धिष्ट हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व त्यांच्या कुटुंबाचा सर्वागीण विकास साधणे हा आहे.
या कर्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांनाअर्धा एकर क्षेत्रावरती आंबा लागवड करण्यास मदत केली जात आहे तसेच या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी प्रशिक्षण, लागणारी खते व औषधे पुरविली जातात. पाणी व्यवस्थापनासाठी विविध प्रकारची जल उपसा साहित्य खरेदी करण्यास देखील अर्थसहाय्य केले जाते.याशिवाय शेतकऱ्यांना भाजीपाला व फुलशेती करण्यास प्रोत्साहित केले जाते.त्यासाठी लागणारे बियाणे व रोपे देखील या उपक्रमाअंतर्गत दिली जातात. या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना आंब्याची कलमे करणे, मोगऱ्याची शेती करणे, ट्रेमध्ये भाजीपाल्याचे उत्पन्न घेणे अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देखील दिले जाते.
सदर उपक्रमांतर्गत आतापर्यंत ५८६ लाभार्थींनी लाभ घेतला असून १२००० पेक्षा जास्त आंबा झाडांची लागवड केली गेली आहे. 
प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या वाटप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड चे प्लांट हेड राधेश्याम सिंग, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य काशिनाथ पाटील, नगरसेविका अरुणा किरण दाभणे,तसेच कंपनीचे कॉर्पोरेट अफेअर्स चे ए व्ही पी अरुण शिर्के, सिनियर मॅनेजर अभिजित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.