नंदुरबार बस आगारातील दोन कर्मचाऱ्यांचा हृदय विकाराने मृत्यू
सिटी बेल | नंदुरबार |
गेल्या अनेक महीन्यांपासून बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे त्यामूळे अनेक कर्मचाऱ्यांच्या घरची चुल पेटेनाशी झाली आहे व कर्मचाऱ्यांवरील मानसीक ताण सहनशक्ती पलीकडे गेला आहे. त्यामुळे अनेक बस कर्मचारी अती तणावाने एकतर हृदयविकाराचे शिकार होताहेत किंवा आत्महत्या करत आहेत.
काल दोन संपकरी कर्मचाऱ्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नंदुरबार आगारातील एक वाहक व एक चालक अशा दोन कर्मचाऱ्यांचा काल दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी हृदय विकाराने मृत्यू झाला त्यामूळे बस कर्मचाऱ्यात एस टी महामंडळाच्या जाचक वागणूकीबद्दल अत्यंत संताप व्यक्त केला जात आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी त्यांचे शव एसटी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गून्हा दाखल केल्याशिवाय ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतल्याने खळबळ माजली आहे.
परवा देखील अकोट येथे शहादा डेपोतील कर्मचारी यांनी नैराश्यामूळे रस्त्यावर कारसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती त्यामूळे कर्मचारी खूप व्यथीत आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर सरकारने मान्य कराव्यात व गिरणी कामगारांच्या संपाने जशी घरे उध्वस्त झाली तशी परीस्थीती बस कर्मचाऱ्यांवर येवू नये अशी जनतेत अपेक्षा व्यक्त होत आहे








Be First to Comment