श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट तर्फे ७०० कुटुंबाना मायेची उब
सिटी बेल | पालघर | सुनिल ठाकुर |
पालघरमधील वाडा तालुका विभागातील ७०० कुटुंबांना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा कार्यक्रम श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट तर्फे आयोजित केला होता.
कार्यक्रमाला उपविभाग प्रमुख दामोदर म्हात्रे, शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, सुनील पाटील आणि मुंबई यूथ एसोसिएशन अध्यक्ष वैभव दामोदर म्हात्रे उपस्थित होते.७०० कुटुंबाना मायेची उब देणाऱ्या दानशूर व्यक्ती आणि श्रीमती शांताबाई जयराज म्हात्रे ट्रस्ट यांचे स्थानिक नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले.








Be First to Comment