रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे खोकराळे माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप
सिटी बेल | रामकृष्ण पाटील | नंदुरबार – खोकराळे |
सध्या खान्देशात कडाक्याची थंडीचा जोर धरू लागल्याने प्रत्येक व्यक्ती थंडीच्या बचावासाठी उपाय शोधत आहे.
मात्र गरीब व गरजू व्यक्तींचे काय ? ज्यांच्याकडे थंडी बचावाचे साधन नाही.त्यांच्यासाठी “रोटरी क्लब ऑफ नंदनगरीने” ब्लॅंकेट व स्वेटर गरजू व्यक्तीं पर्यंत पुरवण्याचे ठरविले
माध्यमिक विद्यालय खोकराळे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात “रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे” सचिव रो.अनिल शर्मा रोटरी क्लब चे रो.राहुल पाटील व रो.दिनेश साळुंखे, काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील तसेच गावातील जयदेव विठोबा बोरसे , संजय बोरसे, अण्णा ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस जी सैंदाणे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.









Be First to Comment