प्रीती जॉर्ज म्हात्रे महाविकास आघाडीच्या उपमहापौर पदाच्या उमेदवार
सिटी बेल | पनवेल |
पनवेल महानगरपालिकेमध्ये माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने उपमहापौर पदासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे यांनी आज सोमवार दिनांक 10 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी त्यांच्यासोबत शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेश कडू, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेविका प्रिया भोईर, प्रज्योती म्हात्रे, अरूणा दाभणे उपस्थित होते.
Be First to Comment