Press "Enter" to skip to content

18 ते 35 या वयोगटासाठी स्पर्धा

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाची युवकांसाठी लेख स्पर्धा

सिटी बेल | मुंबई/नाशिक |

12 जानेवारी, राष्ट्रीय युवा दिनाच्या औचीत्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाने 18 ते 35 या वयोगटातील युवकांसाठी ‘कुसुमाग्रजांच्या कवितांमधील सामाजिक आशय’ या विषयावर लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

लेख स्व-लिखीत असावा आणि मुद्रीत, इलेक्ट्रॉनीक किंवा समाज माध्यमांवर प्रकाशित झालेला नसावा. लेख किमान 1500 तर कमाल 2500 शब्दांत असावा. युनीकोड/मंगल फॉन्ट मध्ये टाईप करून kusumagrajchair@ycmou.ac.in या इमेलवर स्पर्धकांनी लेख पाठवायचा आहे. इतर फॉन्टमधील लेख स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. इ-मेलने पाठवलेल्या लेखाची हार्ड कॉपी पोस्टाने पाठवायची आहे. लेखाच्या पानावर स्पर्धकाने आपले नाव अथवा ओळख पटेल असा कोणताही मजकूर लिहू नये. स्पर्धकाने लेखासोबत वयाचा पुरावा देणारे प्रमाणपत्र जोडावे. स्पर्धकाने आपले नाव, संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक आदि तपशील स्वतंत्रपणे द्यावा.

या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून एका स्पर्धकाला एकच लेख पाठवता येईल. स्पर्धेसाठी नेमलेल्या परीक्षकांचा निर्णय अंतीम राहील. स्पर्धकानी 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपले लेख kusumagrajchair@ycmou.ac.in या इमेलवर पाठवावेत. लेखाची हार्ड कॉपी पोस्टाने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत विद्यापीठात प्राप्त होईल अशा बेताने पाठवावी.

लेखाची हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता :-
डॉ. प्रवीण घोडेस्वार, समन्वयक, कुसुमाग्रज अध्यासन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक – 422 222

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रासह रु. 5000/- (प्रथम क्रमांक), रु. 4000/- (द्वितीय क्रमांक), रु. 3000/- (तृतीय क्रमांक), आणि रु. 1000/- प्रत्येकी 3 उत्तेजनार्थ विजेत्यांना एवढ्या रक्कमेची पारीतोषीके दिली जातील. या स्पर्धेचा निकाल 27 फेब्रुवारी 2022 मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला जाहिर करण्यात येईल. स्पर्धेबाबतचा अधिकचा तपशील विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत अधिकाधिक युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.