लक्ष्मण पवार यांच्या निधनाने पाले खुर्द गावात हळहळ
सिटी बेल | रोहा | शरद जाधव |
नाते संबधात लग्न सोहळा सुखाचा क्षण याच वेळी काळ येइल आपल्याला घेऊन जाईल याची पुसटशी देखील कल्पना नसनार्या लक्ष्मण पवार या 32 वर्षीय तरुणांचा आपघातात बळी गेला. अचानक होत्या चे नव्हते झाले .कर्तबगार मुलगा गेल्याने कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले आहे तर या तरुणाचे मृत्यू ने पाले खुर्द गावात अक्षरशः हा हळहळ दिसून आली. अतिशय शोकपुर्ण वातावरणात तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर तरुण हा शांत मनमिलाऊ निर्व्यसनी होता. धाटाव येथील निलिकोंन कंपनीत तो कायम स्वरुपी कामगार होता. आपल्या सगे सोयरे यांच्याकडे पनवेल येथे लग्न होते म्हणून सर्व एकत्रित चार चाकी वहानामध्ये गेले होते. लग्न सभारंभ उरकून येत असताना वडखळ जवळ हा अपघात झाला. या अपघातात पवार याचा जागीच मृत्यू झाला तर काही जखमी असुन अत्यवस्थ देखील असल्याचे समजते. सर्व एकत्र कुटुंब असल्याने लहान मुलाचा देखील यात समावेश आहे.
निधनाची वार्ता समजताच निलिकौन कंपनिचे मॅनेजेर, अधिकारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थीत होते.
या दुर्देवी घटने संबंधी महिती देताना या गावचे सामजिक राजकिय युवा कार्यकर्ते महेश ठाकुर यांनी संगितले की, अतिशय दुःखद घटना असुन लक्ष्मण पवार या तरुणाच्या जाण्याने कुटुंब पोरके झाले आहे. या कुटुंबाला आता अधाराची गरज आहे. निलिकॉन कंपनी ने एक आपला प्रामाणिक कामगार गमावला असुन या कंपनी ने पवार कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे व त्यांना पाठबळ द्यावे अशी मागणी ठाकुर यांनी केली.








Be First to Comment