पनवेल महानगरपालीकेत बाहेरील जिल्ह्यातील नोकर भरती न करता स्थानिकांना प्राधान्य देण्याची शिवसेनेची मागणी
सिटी बेल | पनवेल |
महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी धोरणांनुसार नोकर भरतीत १००% टक्के स्थानिक प्रकल्पग्रस्त व बेरोजगारांना प्राधान्याने सामावून घेणे आवश्यक आहे. तरी देखील पनवेल महानगरपालीकेत बाहेरील तालुक्यातील व जिल्ह्यातील नोकर भरती करून, स्थानिकांवर अन्याय होत आहे. या संदर्भात आज पनवेल महानगरपालीका आयुक्त गणेश देशमुख यांना शिवसेना पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी शिवसेना जिहाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका अंतर्गत नोकर भरती बाबत निवेदन दिले.
या प्रसंगी तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, महानगर समन्वयक गुरूनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, खारघर शहरप्रमुख प्रकाश गायकवाड, पनवेल शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विभाग संघटक रामचंद्र देवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment