सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण नगर परिषदेचे सेवानिवृत्त (माजी ) कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते उरण शहरातील देऊळवाडी येथील रहिवाशी रमेश वत्सराज (वय 77 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रेमळ, मितभाषी, मनमिळावू स्वभाव असलेले रमेश वत्सराज यांनी उरण नगर परिषदेत एकूण 38 वर्षे सेवा केली.ते पौराहित्याचे सुद्धा काम करत होते.ते ब्राह्मण सभेचे सक्रिय सदस्य होते. त्यांच्या निधनाने वत्सराज परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण उरण तालुक्यात शोककळा पसरली आहे.पत्नी, 2 मुले,2 सुना, 1 मुलगी,5 नातवंडे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे.
उरण नगर परिषदेचे कर्मचारी जयेश वत्सराज तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश वत्सराज यांचे ते वडील होते. देऊळवाडी युवक मंडळाचे पदाधिकारी , देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी , ब्राह्मण सभेचे पदाधिकारी , उरण नगर परिषदेचे पदाधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत बोरी येथील स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले.








Be First to Comment