प्राण्याचे आवाज काढून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनाची सर्कस केली : शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे
सिटी बेल | मुंबई |
मुंबईत २२ डिसेंबरला सुरु झालेल्या अधिवेशनात २६ विधयके व अध्यादेश मांडण्यात येणार असून सामान्य जनतेच्या समस्या कशा सोडविता येतील यावर विधानसभा व विधानपरिषदेचे आमदार चर्चा करून निर्णय घेत असतात परंतु विरोधी पक्षाच्या काही थिल्लर आमदारांनी प्राण्यांचे आवाज काढून हिवाळी अधिवेशनाची सर्कस करून टाकल्याची टीका करून शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनिषा कायंदे यांनी आज हिवाळी अधिवेशनात दुपारच्या सत्रात पॉइंट ऑफ इफॉर्मेशन मांडून शासनाचे लक्ष वेधले.
काल पर्यावरण मंत्री मा, आदित्यजी ठाकरे व सुनील केदार सभागृहात जात असताना सभागृहाच्या बाहेर पायरीवर बसलेल्या भाजपच्या आमदारांनी “म्याव म्याव” आवाज काढून समस्त सभागृहाचा अपमान केला. याबाबत बोलताना डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, ” लोकांनी लोकांच्या विकासासाठी निवडून दिलेले आमदार जर अशी कृत्ये करीत असतील तर हा सभागृहाचा नाही तर लोकशाहीचा अपमान आहे. सभागृह हे एक मंदिर असून याला अनेक नियम आहेत व या नियमांना बगल देऊन जर विरोधी पक्षाचे आमदार असे वागत असतील तर अशा आमदारांवर कारवाई झालीच पाहिजे व हे कृत्य करणाऱ्या आमदाराने सभागृहाची माफी मागितली पाहिजे”








Be First to Comment