Press "Enter" to skip to content

राज्यातील अग्निशमन सेवा बळकट करण्याचे ध्येय

मुंबईत फायर लायसन्स एजन्सीची “फायर परिषद” संपन्न

सिटी बेल | मुंबई |

राज्यातील अग्निशमन सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र अग्निशमन सेवा तसेच फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया च्या सहकार्याने नुकतीच “फायर लायसन्स एजन्सीची परिषद आयोजित केली होती. ही परिषद नेहरू सेंटर ऑडिटोरियम, वरळी इथे आयोजित करण्यात आलेली होती तसेच या परिषदेला मुंबई, पिंपरी चिंचवड , सिडको उल्हासनगर, वसई-विरार आणि इतर अग्निशमन दलातील ४० हून अधिक अग्निशमन अधिकारी व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रातील ४०० हून अधिक परवानाधारक एजन्सी आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हि परिषद न्यूएज इंडस्ट्री, आंबेरट्रॉनिकस, तुलसी फायर, शाह भोगीलाल जेठालाल ब्रदर्स या मुख्य कंपन्यांनी या परिषदेत सहभाग घेतला होता. महाराष्ट्र अग्निशमन दलाचे संचालक श्री. संतोष वारिक हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन ऑफिसर श्री. हेमंत परब तसेच फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष श्री. रुपेश उमतोल तसेच सचिव श्री. समीर ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. अग्निसुरक्षा क्षेत्रात प्रशिक्षण देऊन आणि नवनवीन तांत्रिक कल्पनांचा अवलंब करून आग न लागण्याच्या घटना कशा टाळता येतील यावर मार्गदर्शन केले तसेच प्रयत्नांना महाराष्ट्र अग्निशमन दलाकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्र अग्नीशमन दलाचे सहाय्यक संचालक श्री. किरण हथ्याल यांनी परवाना जारी करणे आणि नूतनीकरण प्रक्रिया सुव्यवस्थित, पारदर्शक आणि निष्फळ बनवण्यासाठी करण्यात येत असलेल्या विस्तृत कार्याचा उल्लेख केला, त्यांनी अगदी प्रांजळपणे फायर लायसन्स एजन्सीजला कायदेशीर पद्धतींचे पालन करण्यास सांगितले फॉर्म अ आणि ब चुकीच्या पद्धतीने जारी करणे, आवश्यक मानके आणि निकषांनुसार अग्निसुरक्षा यंत्रणा बसवणे किंवा त्यांची देखभाल न करणे किंवा परवाना नूतनीकरण दस्तऐवजांमध्ये खोटा डेटा देणे – आणि सापडलेल्या तक्रारींवर महाराष्ट्र अग्निशमन कायद्यानुसार – कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

आज महाराष्ट्रातील सर्वच मोठ्या शहरामध्ये उंच-उंच इमारती, व्यावसायिक इमारती, शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्स, कारखाने, हॉस्पिटलच्या इमारती, उंच शालेय इमारती, ताराकिंत हॉटेल्सच्या इमारती, भूमिगत रेल्वे – मेट्रो -मार्केट इत्यादींची संख्या दिवसेंदिवस अत्यंत वेगाने वाढत आहे. या सर्व इमारतींमध्ये चांगल्या सोयी- सुविधा पुरविताना त्यामध्ये वापरलेल्या विविध ज्वलनशील वस्तूमुळे व इमारतीमधील मोठ्या प्रमाणात होण्याऱ्या वहिवाटीमुळे आगीचे धोके सुद्धा वाढलेले आहेत.

या परिषदेमध्ये फायर इंडस्ट्री मधील प्रख्यात वक्त्यांनी स्प्रिंकलर सिस्टम डिझाईन पासून मॉडेल चेकलिस्ट आणि फायर इंडस्ट्रीसाठी डिजिटायझेशनचे फायदे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच पॅनेल चर्चा आणि प्रश्नोत्तरांच्या सत्राने परिषद संपली ज्याने सहभागींना त्यांच्या समस्या आणि अपेक्षा थेट अधिकार्‍यांसमोर मांडण्याची संधी दिली.

फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष सुरेश मेनन यांनी सांगितले की, आम्ही लवकरच एक विशेष सेल स्थापन करूनफायर लायसन्स एजन्सीज ला येणाऱ्या समस्या थेट अधिकार्‍यांसमवेत मांडण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्याचे आम्ही ठरविले आहोत अशी माहिती दिली. वरील माहिती फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे कोअर वर्किंग कमिटीचे श्री. झुजर मदारवाला व आर्किटेक्ट श्री. श्रेयश सरमळकर यांनी दिली.

More from मुंबईMore posts in मुंबई »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.