सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने दरवर्षी धम्मयान कॅलेंडर प्रकाशित करण्यात येते. यावर्षी सुद्धा धम्मयान कॅलेंडर २०२२ चे प्रकाशन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्याहस्ते केंद्रीय कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे करण्यात आले.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई , राष्ट्रीय सचिव तथा मुंबई प्रदेश चे पालकमंत्री आगाणे काका, राष्ट्रीय सचिव एस.एस.माने, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे, मुंबई प्रदेश चे अध्यक्ष उत्तम मगरे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सुशील वाघमारे, मुंबई प्रदेशचे सरचिटणीस रविंद्र गवई, मुंबई प्रदेशचे कोषाध्यक्ष विलास खाडे तसेच महाराष्ट्र राज्य शाखेचे व मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment