Press "Enter" to skip to content

पर्यावरण बचावासाठी कार्टर रोड बांद्रा येथे सुपरबॉटम्सतर्फे स्ट्रीट-आर्ट चे आयोजन

सिटी बेल | मुंबई |

एका चित्रामध्ये एक हजार शब्दाची ताकद असते असे म्हटले जाते, म्हंणूनच आज चित्रकला हि जगातील मुख्य कला आहे. हीच कला मुंबईत अनेक ठिकाणी वापरून पर्यावरण संदेशासाठी वापरले जात असून सुपरबॉटम्स या बेबी केअर ब्रँडने कार्टर रोड, वांद्रे येथे ‘सस्टेनेबिलिटी’चा संदेश देणारा अवंत-गार्डे स्ट्रीट आर्ट इव्हेंट आयोजित केला.

दिव्यांग नागरिकांसाठी काम करणाऱ्या त्रिनयनी या सामाजिक संस्थेने यात महत्वाची भूमिका निभावली होती. प्रसिद्ध भित्तिचित्रकार रश्मिल वैद्य यांनी, उत्साही आणि आनंदी मुलांसह एक उत्कृष्ट भित्तिचित्राचा एक उत्कृष्ट नमुना तयार केला यावेळी अनेक छोट्या मुलांनी व त्यांच्या पालकांनी सहभाग घेतला होता यावेळी पर्यावरण वाचवण्यासाठी वेगवेगळ्या संदेशाचे भित्तिचित्र करण्यात आले होते.

मानव हा पर्यावरणाचा एक कुशाग्र घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे पंरतु पर्यावरणाविषयी जागरूकता करावाईची असेल तर चित्रकला हे माध्यम नक्की वापरायला हवे कारण चित्रकलेच्या माध्यमातून संदेश लवकर पोहचला जातो. एक जबाबदार नागरिक म्हणून आम्ही हा पर्यावरणाचा संदेश या स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती सुपरबॉटम्सच्या संचालिका व मॉम-इन-चीफ, पल्लवी उटगी यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.