वसंतराव सुर्वे यांचे अल्पशा आजाराने निधन
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव सुर्वे यांचे काल दि.11 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, निधन समयी ते 85 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात मुले, मुली जावई नातवंडे परिवार आहे.
ते बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले होते, राम शीला पूजनापासून आयोध्या राम मंदिर आंदोलनाशी ते जोडले गेले होते, त्यांनी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते, अभिनव ज्ञान मंदिर शिक्षण संस्था, कपालेश्वर देवस्थान ट्रस्ट, लक्ष्मीकांत वाचनालय, जनता सहकारी ग्राहक भांडार,अखंड हरिनाम सप्ताह अशा अनेक संस्थांची जबाबदारी घेऊन विश्वस्त म्हणून काम पाहिले होते. अखेरच्या क्षणापर्यंत ते कोणत्या ना कोणत्या कामात मग्न होते त्यांच्या जाण्याने संघ परिवारातील जेष्ठ कार्यकर्ते गमावले आहेत.








Be First to Comment