भाऊ कडू गुरुजी यांचे निधन
सिटी बेल | उरण | प्रतिनिधी |
सेवानिवृत्त शिक्षक भाऊ पदू कडू यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर शिवाजीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
भाऊ कडू यांनी शिक्षकीपेशात अनेक विद्यार्थी घडविले, ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. ते कुशल कारपेंटर म्हणून ओळखले जात. त्याचबरोबर मुतखडा या आजारावर आयर्वेदीक उपचार करून 10 हजारांच्यावरती रुग्ण त्यांनी बरे केले आहेत. त्यांची प्रचिती एवढी झाली होती की एका अमेरिकेत राहणार्या भारतीयाने हे औषध वापरून त्यांना फरक पडला होता. त्यामुळे त्यांना मुतखड्यावरील औषध देणारे डॉक्टर अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. मुतखड्यावरील आयर्वेदीक औषध घेण्यासाठी त्यांच्या घरी सकाळी 6 वाजल्यापासून माणसांची गर्दी होत असे. हे औषध मोफत देत त्याचबरोबर येणार्या माणसांचा घरातील मंडळी यथोचित पाहुणचार ही करीत असत. त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण होण्याआधीच त्यांनी वहाळ येथील साई मंदिरास 80 किलो वजनाची चांदीची पालखी भेट दिली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले राजेश व शिरीष, मुलगी शुभांगी घरत, भाऊ, सुना, पुतणे, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे होमविधी गुरुवार दि. 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता शिवाजीनगर (गव्हाण) येथे करण्यात येणार आहे. दशक्रिया विधी गुरुवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता मोरावे लांगेश्वर येथे करण्यात येणार आहे. दिवसकार्य रविवार दि. 20 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर येथे राहत्या घरी करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नसल्याचे कुटूंबियांतर्फे सांगितले आहे.








Be First to Comment