Press "Enter" to skip to content

कामगार क्षेत्रात वाजतोय न्यू मेरी टाईम चा डंका

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चौफेर घोडदौड सुरु

एक वर्षात तब्बल बारा कंपन्यांच्या मध्ये संघटनेचे युनिट झाले सुरू

सिटी बेल | शेलघर – उलवे |

कामगार क्षेत्रात न्यू मेरिटाइम अँड जनरल कामगार संघटनेची चौफेर घोडदौड सुरू आहे.कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कुशल नेतृत्वाखाली ही संघटना दिवसेदिवस मजबूत बनत आहे.कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी अग्रस्थानी असणाऱ्या या संघटनेकडे कामगारांची प्रथम पसंती दिसून येते.प्रतिवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र घरत आणि पदाधिकारी पत्रकारांशी संवाद साधत असतात.यंदाचे वर्षी हा पत्रकार संवाद सोहळा शेलघर येथील समाज मंदिरात संपन्न झाला.

संघटना करत असलेल्या विविध उपक्रमांचे बाबत पत्रकारांना अवगत करण्यासाठी चित्रफित दाखवून संवाद सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.संघटनेचे अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली असल्याने या कार्यक्रमात दुग्धशर्करा योग जुळून आल्याची अनुभूती येत होती.कदाचित त्यामुळेच की काय ? यंदाच्या वर्षी पत्रकारांची रेकॉर्डब्रेक उपस्थिती जाणवली.

आपल्या भाषणात महेंद्र घरत म्हणाले की 154 कंपन्यांच्या युनिटमध्ये संघटना कार्यरत असून 12650 सभासद संघटने चे नोंदणीकृत सदस्य झाले आहेत.बर्जर पेंट, कस्टम हाऊस कामगार,बिर्ला कार्बन यासारख्या बारा कंपन्याच्यात कामगारांनी आमच्या संघटनेचा झेंडा हाती घेतला आहे.कोरोना कालखंडाचा फटका बसला असून देखील आमच्या संघटने मूळे तब्बल 50 कंपन्यांच्या मधल्या कामगारांना घसघशीत दिवाळीचा बोनस मिळवून दिला.कमीत कमी 8000 ते जास्तीत जास्त 65000 अशी या बोनस रेंज ची व्याप्ती आहे.संघटनेसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे तब्बल अकरा कंपन्यांच्या मध्ये वेतन वृद्धी करार घडवून आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

प्रसिद्ध शिवव्याख्याते प्रशांत शांताराम देशमुख यांनी लिहिलेल्या जय शिवराय या पुस्तकाची एक प्रत पत्रकारांना भेट म्हणून देण्यात आली.प्रशांत देशमुख यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका पत्रकारांसमोर विशद केली.कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या पत्रकार संवाद सोहळ्याला महेंद्र घरत यांच्यासह शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, विजय कडू,दा चा कडू, उपाध्यक्ष किरीट पाटील, सरचिटणीस रमण, सचिव वैभव पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.