Press "Enter" to skip to content

शिक्षणाचे स्वप्न पूर्ण

आशादिप ग्रुप ची गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाकरीता सामाजिक बांधिलकी

सिटी बेल | हदगाव | राहुल बहादूरे |

आज श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सर्वच पालक खर्च करण्यासाठी तयार असतात. पण काही विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत शिक्षणात मागे आहेत. पण काही विद्यार्थी परीस्थिती नसताना जिद्द चिकाटीने अभ्यास करून शिक्षणासाठी धडपड करीत यशाचे शिखर गाठतात. अशा गरिब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नसल्याने शैक्षणीक वर्ष वाया जाते की काय अशी भीती विद्यार्थी व त्यांच्या कुटूंबीयाच्या मनात असतांना मुलाच्या पुढील शिक्षणा करीता देवदुत म्हणून सामाजिक संघटना दानशूर व्यक्तींच्या दायीत्वाने शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत आहे.

अश्याच परिस्थितीला हदगाव तालुक्यातील आशादीप ग्रुप पुढे आला असल्याने सदर मुलाचे पुढील शिक्षणाचे स्वप्न पुर्ण झाले आहे. हस्तरा ता. हदगाव येथील अदीत्य पंडीत असोले या विद्याथ्र्याने प्रतिकुल परीस्थीती मध्ये मोल मजुरी करुन कसे बसे बारावी (विज्ञान) पर्यंत शिक्षण केले. बारावी मध्ये अदित्य ला चांगले गुण मिळाले. पण पुढील शिक्षण घेण्यासाठी पैसा नसल्याने चांगले गुण घेऊन घरी बसण्याची वेळ आली होती. घरी उत्पन्ना चे काही साधन नाही अदीत्य चे वडील दिव्यंग असल्याने त्यांना काम जमत नाही, आई च्या मोलमजुरी वर संसाराचा गाडा चालतो .

आदीत्य ला बारावी ला चांगले गुण मिळाल्याने त्याने डी. फॉम. सी ला अर्ज केला असता त्यांचा नंबर परभणी येथील कॉलेज ला लागला. पण कॉलेज ची शुल्क तिथ राहण खाण्याची व्यवस्था कशी करावी याचा विचार मनात येत असतांना ही बाब आशादीप ग्रुप ला कळल्यावर त्यांनी जमेल तेवढी आर्थीक मदत केली. तर पुणे येथील शिवाजी कदम यांनी सदर मुलाची वर्षभर परभणी येथे राहण्याची व जेवणाची जबाबदारी घेतली तर निवघा (बा) येथील विश्वजीत कदम यांनी रोख ११०० रुपयाची मदत केल्याने आदीत्य चा पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. अनपेक्षीत मदत मिळाल्याने अदीत्य व त्यांच्या कुटूंबियाला आनंदाश्रू अनावर झाले होते.

या वेळी हरीशचंद्र चिल्लोरे, हळद व्यवस्थापक सतीश खानसोळे, हदगाव येथील प्रतीष्ठीत व्यापारी अनुप सारडा, कुमार उमरे, सरपंच मल्हारी सोळंके उपसरपंच, मोतीराम बमरुळे, बि.पी. माटाळकर, रामेश्वर बोरकर किसन सोळके मल्हारी सोळंके उपस्थीत होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.